Fardeen Khan : घटस्फोटांच्या चर्चेदरम्यान पत्नी आणि दोन मुलांसोबत दिसला फरदीन खान, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 12:09 IST2023-08-12T11:50:50+5:302023-08-12T12:09:23+5:30
अभिनेता फरदीन खान आणि त्याची पत्नी नताशा माधवानी यांनी लग्नाच्या १८ वर्षानंतर घटस्फोट घेणार अशी चर्चा रंगली होती.

Fardeen Khan : घटस्फोटांच्या चर्चेदरम्यान पत्नी आणि दोन मुलांसोबत दिसला फरदीन खान, व्हिडीओ व्हायरल
फरदीन खान मोठ्या पडद्यावरुन गायब असला तरी त्याचा आजही चाहता वर्ग आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्याला घेऊन चर्चेत आला आहे. अभिनेता फरदीन खान आणि त्याची पत्नी नताशा माधवानी यांनी लग्नाच्या १८ वर्षांनंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता असं वाटतंय की दोघं आपल्या नात्याला एक संधी पुन्हा देण्याचा प्रयत्न करतायेत. घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान दोघे मुलांसोबत एकत्र स्पॉट झाले.
११ ऑगस्टला फरदीन खान आणि नताशा माधवानी दोघे एकत्र दिसले. घटस्फोटाच्या चर्चेच दरम्यान दोघेही मुलांसोबत खुश दिसले. यावेळी फरदीनने ग्रे रंगाचा टी-शर्ट घातला होता ज्यात तो नेहमी प्रमाणे हँडसम दिसत होता. पापराझींना बघून अभिनेता काहीसा नाराज झाला. फरदीनची पत्नी ही व्हाईट कलरच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती. तर दोनही मुलं क्युट दिसत होती. फरदीनच्या कुटुंबा एकत्र पाहून चाहत्यांच्या त्यांच्या पुन्हा एकत्र येण्याच्या आशा पाल्लवित झाल्यात.
फरदीन खान आणि नताशा माधवानी गेल्या काही महिन्यांपासून वेगळे होते. फरदीन मुंबईत तर नताशा मुलांसोबत लंडनमध्ये होती. त्यांच्या एका जवळच्या मित्राने झूम टीव्हीला सांगितले की होते की, 'फरदीन आणि नताशा यांच्यात मुलांच्या शिक्षणावरुन मतभेद व्हायचे. दोन्ही मुलांचं शिक्षण मुंबईत व्हावं अशी फरदीनची इच्छा होती तर नताशाला मात्र त्यांनी दुबईत शिकावं असं वाटत होतं. त्यांच्यात एकमत झालंच नाही..'
2009 साली वडील फिरोज खान यांच्या निधनानंतर फरदीन लंडनला स्थायिक झाला होता. त्याच्या दोन्ही मुलांचा जन्मही तिथेच झाला. फरदीन खान बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याच्या तयारित आहे. १२ वर्षांच्या ब्रेकनंतर तो संजय गुप्तांच्या 'विस्पुट' या सिनेमात रितेश देशमुखसोबत झळकणार आहे. तसंच संजय लीला भन्साळींच्या आगामी 'हीरामंडी' वेबसिरीजमध्येही त्याची वर्णी लागली आहे.