फरदीन खानचं 14 वर्षांनंतर दमदार कमबॅक! संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' मधील फर्स्ट लूक समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 14:50 IST2024-04-07T14:48:50+5:302024-04-07T14:50:11+5:30
फरदीन खान बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे.

फरदीन खानचं 14 वर्षांनंतर दमदार कमबॅक! संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' मधील फर्स्ट लूक समोर
बॉलिवूडचे लोकप्रिय सिने-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांची 'हीरामंडी' (Heeramandi) ही सीरिज ओटीटीवर पदार्पण प्रदर्शित होणार आहेत. ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 'हीरामंडी'मध्येही प्रेक्षकांना शाही थाट, आकर्षक मांडणी, नाट्यमय भव्यदिव्य सेट पाहायला मिळणार आहे. याच सीरिजमधून आता फरदीन खानबॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. त्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे.
'हीरामंडी'मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या फरदीन खानची पहिली झलक समोर आली आहे. आज अभिनेत्याचे पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. नवाबी कपड्यांमध्ये मखमली सोफ्यावर फरदीन खान बसलेला दिसून येत आहे. फरदीनचा हा लूक अगदी हटके आहे. यावरुनच त्याचं पात्र हे दमदार असल्याचं कळतंय. या सीरिजमध्ये फरदीन खान हा वली मोहम्मदची भूमिका साकारत आहे. त्याला या सीरिजमध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.
फरदीन खान सिनेविश्वातील सर्वोत्तम कलाकारांपैकी एक आहे. नो एन्ट्री, फिदा आणि हेय बेबी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करणारा फरदीन खान 14 वर्षांनंतर संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी' या मालिकेतून पुनरागमन करत आहे. तो शेवटचा 2010 मध्ये 'दुल्हा मिल गया' या चित्रपटात दिसला होता. 'हीरामंडी' ही सीरिज 1 मे 2024 रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज होत आहे. यात या सीरिजमध्ये मनीषा कोइराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, ऋचा चड्ढा, शर्मिन सहगल आणि संजीदा शेख या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत.