तब्बूची मोठी बहीण फरहा नाज आठवते का ? निर्मात्याच्या कानाखाली वाजवल्याने आली होती चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 12:02 PM2023-03-08T12:02:20+5:302023-03-08T12:14:13+5:30

पार्टीत निर्माते तिला असं काही बोलले की तिने थेट त्यांच्या कानाखालीच लगावली.

farha naaz tabbu's elder sister in limelight after she slapped a producer in party | तब्बूची मोठी बहीण फरहा नाज आठवते का ? निर्मात्याच्या कानाखाली वाजवल्याने आली होती चर्चेत

तब्बूची मोठी बहीण फरहा नाज आठवते का ? निर्मात्याच्या कानाखाली वाजवल्याने आली होती चर्चेत

googlenewsNext

Farha Naaz : 80च्या दशकातील अभिनेत्री फरहा नाज आठवते का ? हो तीच तब्बूची (Tabu) मोठी बहीण फरहा नाज जिने एका पार्टीत निर्मात्याच्या कानाखाली वाजवली होती. ८० च्या दशकात फरहा नाज आघाडीची अभिनेत्री होती. १९८८ मध्ये आलेल्या 'यतीम' सिनेमात तिने काम केले. या चित्रपटात तिच्यासोबत सनी देओल होता. जेपी दत्ता यांनी तो् दिग्दर्शित केला होता. सिनेमा बॉक्सऑफिसवर तुफान चालला. सिनेमाच्या सक्सेस पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते. पार्टीत जेपी दत्ता यांचे खास मित्र फारुख नाडियादवालाही होते.

फराहने नाडियादवाला यांच्या कानाखाली वाजवली

पार्टीत फारुख नाडियादवाला यांनी थोडी जास्त ड्रिंक केली होती. त्यांनी फराह ला पार्टीत पाहिल्यानंतर ड्रिंक ऑफर केली. मात्र तिने दारु पिण्यास नकार दिला. तिच्या नकारानंतरही ते तिला जबरदस्ती विचारत होते. मात्र तिने शेवटी नकारच दिल्याने फारुख यांना राग आला. ते तिला असं काही बोलले की तिने थेट त्यांच्या कानाखालीच लगावली.

कोणत्या गोष्टीवर फराह भडकली 

ड्रिंक करण्यास सतत नकार दिल्यानंतर फारुख तिला म्हणाले जर तू साडीमुळे नकार देत असशील तर साडी काढून टाक. फारुखचे हे वाक्य ऐकताच फरहा भडकली आणि तिने थेट निर्मात्याच्या कानाखाली वाजवली.  यानंतर ती ताबडतोब पार्टी सोडून निघून गेली. 

पार्टीत अनेक पत्रकारही होते त्यामुळे ही बातमी सगळीकडे पसरली. अगदी हेडलाईन बनली. मात्र फरहाने नंतर समोर येत सांगितले की मी त्यांच्या कानाखाली मारली नाही तर फक्त राग व्यक्त केला होता.

फरहा नाजने तिच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ऋषी कपूर, सनी देओल, संजय दत्त, गोविंदा, अनिल कपूर या आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर त्यांची जोडी गाजली.'नसीब अपना अपना', 'यतीम', 'इमानदार', 'घर घर की कहानी' यासह अनेक सिनेमांमध्ये तिने मुख्य भूमिका साकारली आहे.

Web Title: farha naaz tabbu's elder sister in limelight after she slapped a producer in party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.