फरहान अख्तरने या सिनेमासाठी 6 आठवड्यात वाढविले तब्बल 15 किलो वजन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 08:00 AM2020-04-11T08:00:00+5:302020-04-11T08:00:00+5:30
फरहान अख्तरने आगामी सिनेमासाठी जी-तोड मेहनत घेतली आहे.
फरहान अख्तरने त्याचा आगामी चित्रपट तुफानचा पोस्टर पाहून या चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीन वाढली आहे. या चित्रपटात फरहान अख्तर बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी फरहानने खूप मेहनत घेतली आहे. त्याने या भूमिकेसाठी सहा आठवड्यात तब्बल 15 किलो वजन वाढविले आहे.
फरहान अख्तरने तुफानमधील भूमिकेसाठी वजन घटविले आणि वाढविले आहे. त्याबद्दल त्याने सांगितले की, माझ्यासाठी फिटनेस जगण्याची एक पद्धत आहे. माझ्यासाठी इतके वजन घटविणे खूप मोठे चॅलेंज होते. त्यासाठी मी व्यायामासोबत जास्त फॅट्स, कार्ब्स व स्टार्च खाण्याचा समावेश होता. वजन वाढविताना मी तळलेल्या पदार्थ खाल्ले होते. अशा पद्धतीने मी 15 किलो वजन वाढविले आहे.
तुफानचे शूटिंग मुंबईतील डोंगरी येथील झोपडपट्टीत व गेटवे ऑफ इंडिया येथील वास्तविक ठिकाणी झाले आहे.
या चित्रपटात फरहानसोबत मृणाल ठाकूर व परेश रावलही मुख्य भूृमिकेत दिसणार आहे.
फरहान अख्तर तुफान सिनेमातून बॉक्सिंगच्या रिंगमध्ये पाऊल टाकण्यासाठी सज्ज आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित हा चित्रपट 18 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.