चौथीच्या पाठ्यपुस्तकातील विचित्र प्रयोगामुळे फरहान अख्तर भडकला; प्रयोग वाचाल तर हैराण व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2017 08:21 AM2017-02-10T08:21:25+5:302017-02-10T14:56:43+5:30
हल्लीच्या शिक्षणप्रणालीत अनेक त्रुटी असल्याचा नेहमीच आरोप केला जातो. या आरोपाला बळकटी देणारा काहीसा असाच प्रयोग चौथीच्या पाठ्यपुस्तकात केला ...
ह ्लीच्या शिक्षणप्रणालीत अनेक त्रुटी असल्याचा नेहमीच आरोप केला जातो. या आरोपाला बळकटी देणारा काहीसा असाच प्रयोग चौथीच्या पाठ्यपुस्तकात केला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. जेव्हा हा संपूर्ण प्रकार अभिनेता फरहान अख्तर याच्या निदर्शनास आला तेव्हा त्याच्या संतापाला पारावार उरला नाही. त्याने ट्विटरवर आपला संताप व्यक्त करताना पाठ्यपुस्तकाचा स्क्रीनशॉट शेअर करीत ‘असाही प्रयोग केला जाऊ शकतो यावर विश्वासच बसत नसल्याचे म्हटले.’
त्याचे झाले असे की, इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात सजीवांना जगण्यासाठी कशा पद्धतीने हवेची गरज भासत असते हे समजावून सांगणारा एक विचित्र प्रयोग विद्यार्थ्यांना करण्याचे सांगण्यात आले आहे. या प्रयोगानुसार दोन लाकडी बॉक्स घेऊन त्यामध्ये मांजरीचे दोन पिल्ले ठेवण्याचे सांगितले. मात्र त्यातील एका बॉक्सला छिद्र करण्याचे सांगितले, तर दुसरा बॉक्स हा संपूर्ण पॅक असायला हवा, जेणेकरून त्यात हवा जाणार नाही. काही वेळानंतर जो बॉक्स संपूर्ण पॅक असेल, त्यातील मांजरीचे पिल्लू मृत अवस्थेत आढळणार, तर ज्या बॉक्सला छिद्र केले गेले त्यातील पिल्लू हे जीवंत असल्याचे आढळून येईल, असा प्रयोग पाठ्यपुस्तकात दर्शविला होता.
जेव्हा हा प्रयोेग फरहान अख्तरच्या वाचनात आला तेव्हा त्याच्या संतापाचा पारावार उरला नाही. त्याने आपला संताप ट्विटरवर व्यक्त केला. जेव्हा त्याने हे ट्विट केले तेव्हा काही वेळातच त्याला १२०० लोकांनी रिट्विट करीत या प्रयोगाची तथा शिक्षणाप्रणालीची थट्टा उडविली. या विचित्र प्रयोगाबाबत फरहान अख्तर हा पहिलाच संताप करणारा व्यक्ती नाही, तर यापूर्वीदेखील या प्रयोगाविषयी संतापजनक ट्विट करण्यात आले आहेत. २ फेब्रुवारी रोजी लोला कुट्टियम्मा नावाच्या एका ट्विटर यूजरने याविषयी टीका केली होती. त्यामध्ये लोलाने म्हटले होते की, याविषयी आम्ही महिला तथा बाल कल्याणमंत्री मनेका गांधी यांच्याकडे तक्रार केली आहे.
यावेळी फरहानने लोकांनी केलेल्या रिट्विटरला कमेंट दिल्या. एका रिट्विटमध्ये म्हटले की, प्रकाशकांनी हे पुस्तक वितरकांना परत देण्याचे म्हटले आहे. अपेक्षा आहे की, सीबीएसई सुद्धा तातडीने पाठ्यक्रमातून हे पुस्तक वगळणार. तर यूजर्सने म्हटले की, हा निव्वळ फालतूपणा आहे. मांजराच्या पिल्लांचा जीव घेऊन तुम्ही मुलांना काय धडे देऊ इच्छिता, तर एका यूजर्सने चक्क या पुस्तकातून मुलांना सिरियल किलर बनण्याचे धडे दिले जात असल्याचे म्हटले आहे. फरहाननेदेखील यूजर्सच्या या मतांचे एकप्रकारे समर्थन केले आहे. आता हे पुस्तक पाठ्यक्रमातून वगळण्यासाठी काय प्रयत्न केले जातील हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.

This. Is. Just. Unbelievable.
From a Class IV textbook on Environmental Studies. Anyone responsible for this reaching the kids desks? pic.twitter.com/NJ2FWkwO0O— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) February 9, 2017 ">http://
}}}}This. Is. Just. Unbelievable.
From a Class IV textbook on Environmental Studies. Anyone responsible for this reaching the kids desks? pic.twitter.com/NJ2FWkwO0O— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) February 9, 2017