वडिलांच्या लग्नात थिरकल्या फरहानच्या लेकी; पाहा शिबानी-फरहानच्या लग्नाचे Inside photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 18:56 IST2022-02-23T18:55:25+5:302022-02-23T18:56:03+5:30
Farhan akhtar: फरहान आणि शिबानीच्या लग्नात अख्तर कुटुंबातील प्रत्येक सदस्याने हजेरी लावली होती. यात त्याच्या मुलींचाही समावेश होता.

वडिलांच्या लग्नात थिरकल्या फरहानच्या लेकी; पाहा शिबानी-फरहानच्या लग्नाचे Inside photos
बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर याने मागच्याच आठवड्यात अभिनेत्री शिबानी दांडेकर हिच्यासोबत मोठ्या थाटात लग्न केलं. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. या लग्नात हृतिक आणि फरहानच्या डान्सचा एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला होता. परंतु, या लग्नात केवळ हृतिकचं नव्हे तर फरहानच्या दोन्ही लेकींनीदेखील जबरदस्त डान्स केला होता. सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर चर्चिले जात आहेत.
फरहान आणि शिबानीच्या लग्नात अख्तर कुटुंबातील प्रत्येक सदस्याने हजेरी लावली होती. यात त्याच्या मुलींचाही समावेश होता. विशेष म्हणजे फरहानने त्यांच्यासोबतदेखील डान्स केला. या सुंदर क्षणांचे फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तो त्याच्या लेकींसोबत दिसून येत आहे. तसंच मित्र, परिवार आणि मज्जा मस्तीचे क्षण, असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे.
दरम्यान, शाक्या आणि अकीरा या दोन्ही लेकींसोबतचे फरहानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या शाक्या आणि अकीरा फरहान आणि त्याच्या पहिल्या पत्नीच्या मुली आहेत. फरहानचं पहिलं लग्न हेअरस्टायलिस्ट अधुना भबानीसोबत झालं होतं. मात्र, काही कारणास्तव लग्नाच्या १६ वर्षांनी ते विभक्त झाले. त्यानंतर फरहान शिबानीला डेट करु लागला.