"घटस्फोटाचा मुलींवर परिणाम झाला, मी स्वत:ला दोषी..." , फरहान अख्तरने व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 03:41 PM2024-09-22T15:41:00+5:302024-09-22T15:41:32+5:30

रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये फरहान आणि शिबानी या कपलने हजेरी लावली.

Farhan Akhtar expresses that he felt guilty after divorce as it affected daughters | "घटस्फोटाचा मुलींवर परिणाम झाला, मी स्वत:ला दोषी..." , फरहान अख्तरने व्यक्त केल्या भावना

"घटस्फोटाचा मुलींवर परिणाम झाला, मी स्वत:ला दोषी..." , फरहान अख्तरने व्यक्त केल्या भावना

फरहान अख्तर (Farhan Akhtar) बॉलिवूडचा उत्तम दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेताही आहे.  मात्र तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो.  फरहानचा पहिल्या पत्नीसोबत १६ वर्षांचा संसार मोडला. यानंतर काही वर्षांपूर्वी त्याने शिबानी दांडेकरसोबत दुसरं लग्न केलं. फरहानला पहिली पत्नी अधुनापासून दोन मुली आहेत. घटस्फोटाचा परिणाम मुलींवर झाल्याचं त्याने नुकतंच मान्य केलं.

रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये फरहान आणि शिबानी या कपलने हजेरी लावली. यावेळी फरहान आपल्या घटस्फोटावर म्हणाला, "माझा अधुनाशी घटस्फोट झाल्यावर आमच्या मुली भावनिकरित्या खचल्या होत्या. त्या नाराजही होत्या. माझ्या मुलींसोबत जे झालं यात माझीच चूक आहे. आमच्या घटस्फोटाचा खरंतर मुलींशी काहीच संबंध नव्हता पण याचं नुकसान त्यांनाही भोगावं लागलं. हे नक्कीच सोपं नव्हतं. त्या दोघी ज्या नात्याला एकदम योग्य आणि परफेक्ट समजत होत्या ते आता तुटलं होतं. साहजिकच त्यांच्या मनात राग होता. आतल्या आत त्या निराश झाल्या होत्या."

तो पुढे म्हणाला, "जेव्हा मी आणि अधुना वेगळे झालो तेव्हा मी मुलींसाठी स्वत:लाच दोषी समजायला लागलो होतो. त्या दोघींची खरंतर काहीच चूक नव्हती. कदाचित आजही त्यांच्या मनात माझ्याबद्दल राग असेल."


याआधी फरहान अख्तरने एका मुलाखतीत सांगितले होते की जेव्हा त्याच्या आईवडिलांचा म्हणजेच जावेद अख्तर आणि हनी ईरानी यांचा घटस्फोट झाला तेव्हा फरहान खूप नाराज झाला होता. मात्र पुढे तेच त्याने स्वत:च्या मुलांसोबत केलं याचं त्याला दु:ख वाटत आहे.


2022 साली फरहान आणि शिबानी लग्नबंधनात अडकले. यावेळी फरहानच्या दोन्ही मुलीही हजर होत्या. शिबानीचं दोन्ही मुलींसोबत छान नातं असल्याचं ती या मुलाखतीत म्हणाली.

Web Title: Farhan Akhtar expresses that he felt guilty after divorce as it affected daughters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.