"मी कधीच बनवणार नाही", रणबीरच्या Animal सिनेमावर फरहान अख्तरचं भाष्य; सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 03:43 PM2024-08-27T15:43:58+5:302024-08-27T15:44:16+5:30

फरहान अख्तरची Animal वर रोखठोक प्रतिक्रिया

Farhan Akhtar says he wont produce film like Animal because character in it is problematic | "मी कधीच बनवणार नाही", रणबीरच्या Animal सिनेमावर फरहान अख्तरचं भाष्य; सांगितलं कारण

"मी कधीच बनवणार नाही", रणबीरच्या Animal सिनेमावर फरहान अख्तरचं भाष्य; सांगितलं कारण

लेखक, अभिनेता, दिग्दर्शक, आणि निर्माता अशा हरहुन्नरी भूमिका पार पाडणाऱ्या फरहान अख्तरचे (Farhan Akhtar)  अनेक चाहते आहेत. फरहान लवकरच 'डॉन 3' घेऊन येतोय. यामध्ये शाहरुख नाही तर रणवीर सिंह झळकणार आहे. दरम्यान एका मुलाखतीत फरहान अख्तरनेरणबीर कपूरच्या 'अॅनिमल' सिनेमावर प्रतिक्रिया दिली. हा सिनेमा प्रॉब्लेमॅटिक असल्याचं तो म्हणाला.

फाये डिसूझाच्या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत फरहान अख्तर म्हणाला, "अॅनिमल सिनेमा मला फार खास वाटला नाही. असा सिनेमा बघण्याचा मी कोणाला सल्ला देईन का? तर मला असं वाटत नाही. मला अॅनिमलची निर्मितीची ऑफर असती तरी मी रिजेक्ट केली असती. माझ्या मूल्यांमध्ये ते बसत नाही. मला वाटतं ही भूमिकाच फार प्रॉब्लेमॅटिक आहे."

याआधी फरहान अख्तरने युट्यूबर राज शमनीला मुलाखत दिली होती. त्यावेळीही त्याला अॅनिमल बद्दल विचारण्यात आलं. तसंच याची दिल धडकने दो आणि जिंदगी ना मिलेगी दोबारा' या सिनेमांमधील भूमिकांशी तुलना केल्यास काय वाटतं असा प्रश्न करण्यात आला. यावर तो म्हणाला, "काही गोष्टी दाखवूनच नयेत असं मला अजिबातच वाटत नाही. आपण अशा समाजात आहोत जिथे जर मला कोणी म्हणालं की तुम्ही असे सिनेमे बनवू नका तर मी म्हणेन की मला हे सांगणारे तुम्ही कोण? मला या देशाच्या कायद्याने हक्क दिला आहे आणि मला हवं ते मी बोलू शकतो. प्रेक्षकांना काय बघायचं आहे ते ठरवतील. मी कधीच कोणत्याही निर्माता, लेखकाला असं सांगणार नाही की हे नको बनवू किंवा असे सिनेमे नाही बनवले जाऊ शकत. प्रत्येकाचा आपापला विचार आहे."

Web Title: Farhan Akhtar says he wont produce film like Animal because character in it is problematic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.