कौतुकास्पद! प्रत्येक रूपया महत्त्वाचा म्हणत फरहान अख्तरचा कोरोना रूग्णांना मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 01:23 PM2021-05-02T13:23:22+5:302021-05-02T13:24:50+5:30

सोनू सूद, गुरमीत चौधरी, अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना, सलमान खान असे अनेक कलाकार सध्या कोरोना काळात लोकांसाठी झटत आहेत. आता अभिनेता फरहान अख्तर यानेही लोकांना मदतीचा हात दिला आहे.

farhan akhtar shares a list of foundations excel entertainment helping amid covid 19 | कौतुकास्पद! प्रत्येक रूपया महत्त्वाचा म्हणत फरहान अख्तरचा कोरोना रूग्णांना मदतीचा हात

कौतुकास्पद! प्रत्येक रूपया महत्त्वाचा म्हणत फरहान अख्तरचा कोरोना रूग्णांना मदतीचा हात

googlenewsNext
ठळक मुद्देफरहानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर त्याचा ‘तुफान’ हा सिनेमा येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. 

कोरोनाच्या या भीषण स्थितीत समाजातून अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. बॉलिवूडचे अनेक कलाकारही मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. सोनू सूद, गुरमीत चौधरी, अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना, सलमान खान असे अनेक कलाकार सध्या कोरोना काळात लोकांसाठी झटत आहेत. आता अभिनेता फरहान अख्तर यानेही लोकांना मदतीचा हात दिला आहे.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत फरहानने खुद्द ही माहिती दिली.


 
माझी संस्था एक्सेल एंटरटेनमेंट कोरोना रूग्णांना आवश्यक सुविधा पुरवणार असल्याची घोषणा त्याने केली. अनेक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून हे काम करणार असल्याचे फरहानने सांगितले आहे.  अशा एनजीओंची यादी फरहानने सोशल मीडियावर शेअर केली़
‘करोना विरुद्ध लढ्यात आतापर्यंत देणगी दिलेल्या सगळ्या संस्थांची नावं शेअर करत आहे. ऑक्सिजन ते रुग्णवाहिकांपासून अन्न या सगळ्या  वस्तू पुरवण्याचे अविश्वसनीय काम या संस्था करत आहेत. प्रत्येकाने थोडी मदत करण्यासाठी स्वत:ला प्रोस्ताहित करा. प्रत्येक रुपया महत्त्वाचा आहे. जय हिंद,’ असे ट्वीट फरहानने केले आहे.

फरहानच्या कंपनीने आत्तापर्यंत  हेमकुंट फाउंडेशन, डॉक्टर फॉर यू, मिशन वायु, रसोई ऑन व्हील्स, गिव्ह इंडिया, होप वेलफेयर ट्रस्ट, एसबीएस फाउंडेशन, सत्यार्थ सोशियो अशा काही संस्थाना देणगी दिली आहे. या संस्था रुग्णांना ऑक्सिजन, भोजन, औषधे उपलब्ध करून देत आहेत.
 फरहानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर त्याचा ‘तुफान’ हा सिनेमा येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. हा सिनेमा चित्रपटगृहात रिलीज होणार होता. पण कोरोनामुळे हा प्लान रद्द करण्यात आला. आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे. ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित या सिनेमात परेश रावल कोचच्या भूमिकेत आहेत.

Web Title: farhan akhtar shares a list of foundations excel entertainment helping amid covid 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.