Farhan Akhtar Shibani Dandekar मार्चमध्ये नाही तर या खास दिवशी बांधणार लग्नगाठ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 15:07 IST2022-01-06T14:51:24+5:302022-01-06T15:07:20+5:30
फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि मराठमोळी मॉडेल शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.

Farhan Akhtar Shibani Dandekar मार्चमध्ये नाही तर या खास दिवशी बांधणार लग्नगाठ
फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि मराठमोळी मॉडेल शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. दीर्घकाळापासून हे कपल रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांनी कधीच आपलं नातं लपवलं नाही. दोन वर्षांपूर्वी फरहान पत्नी अधुनापासून विभक्त झाला आणि यानंतर फरहान आणि शिबानी यांच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये ही जोडी पहिल्यांदाच एकत्र माध्यमांसमोर आली आणि पुढे सोशल मीडियावरच दोघांनीही आपआपल्या नात्याची कबुली दिली. आता हे कपल लग्नबंधनात अडकणार असल्याचं कळतंय आणि त्यासाठी मार्च महिन्याचा मुहूर्त निवडला अशी चर्चा होती मात्र लेटेस्ट रिपोर्टनुसार फरहान आणि शिबानी मार्चमध्ये लग्न करणार नाहीत. तर दोघे फरहानच्या वाढदिवसाला लग्न करण्याचा विचार करत आहेत.
बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, फरहान आणि शिबानी (Farhan Akhtar Shibani Dandekar Wedding) लवकरच त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा करणार आहेत. फरहान आणि शिबानी 9 जानेवारी रोजी त्यांच्या लग्नाबद्दल अधिकृत घोषणा करू शकतात. हा खास दिवस निवडू शकतात कारण या दिवशी फरहान अख्तरचा 48 वा वाढदिवस (Farhan Akhtar Birthday) आहे.
मार्चच्या सुरुवातीला लग्न होणार होते
याआधी फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar)मार्च 2022 मध्ये लग्न करणार असल्याचे बोलले जात होते. त्यासाठी दोघांनीही तयारी सुरू केली आहे. लग्नात शिबानी व फरहान सब्यसाची यांनी डिझाईन केलेल्या आऊटफिटमध्ये दिसणार आहेत, अशीही माहिती आहे.मात्र, अद्याप याला कपलकडून दुजोरा मिळालेला नाही आणि कोणतीही प्रतिक्रियाही देण्यात आलेली नाही.
शिबानी दांडेकर हे मॉडलिंग क्षेत्रातील मोठे नाव आहे. टाइमपास या मराठी चित्रपटात ‘साजूक तुपातली पोळी’ या गाण्यात दिसलेली शिबानी दांडेकर अभिनेत्री असण्यासोबतच गायिका आणि मॉडेल आहे.फरहान व शिबानी लव्हस्टोरी कशी सुरू झाली हे जाणून घेण्यास तुम्हीही उत्सुक असाल तर ही लव्हस्टोरी सुरू झाली होती ती 2018 साली