चर्चा तर होणारच ! प्रसिद्ध अभिनेत्याच्या भावासह फरहान अख्तरच्या पत्नीचे अफेअर, सोशल मीडियावर दिली प्रेमाची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 08:25 PM2021-03-30T20:25:00+5:302021-03-30T20:25:53+5:30

Farhan Akhtar-Adhuna Love Story : फरहान अख्तरचे एक्सट्रा मेरिटल अफेअरमुळेच अधुनाने फरहानला घटस्फोट दिला.  अधुना ही प्रसिद्ध हेअरस्टाइलिस्ट आहे. अधुना आता ५४ वर्षांची झाली आहे.

Farhan Akhtar's Ex Wife Adhuna Bhabani, Now Dating Nicolo Morea | चर्चा तर होणारच ! प्रसिद्ध अभिनेत्याच्या भावासह फरहान अख्तरच्या पत्नीचे अफेअर, सोशल मीडियावर दिली प्रेमाची कबुली

चर्चा तर होणारच ! प्रसिद्ध अभिनेत्याच्या भावासह फरहान अख्तरच्या पत्नीचे अफेअर, सोशल मीडियावर दिली प्रेमाची कबुली

googlenewsNext

फरहान आणि अधुना ‘दिल चाहता है’ या चित्रपटादरम्यान भेटले होते. दिग्दर्शक म्हणून फरहानचा हा पहिलाच चित्रपट होता. दोघेही तब्बल तीन वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यादरम्यान ते दोघे नेहमीच कुठल्या ना कुठल्या इव्हेंटमध्ये बघावयास मिळत होते. तीन वर्षे डेटिंग केल्यानंतर पुढे हे जोडपे लग्नाच्या बंधनात अडकले.

 

या जोडप्याला शाक्या आणि अकिरा नावाच्या मुली असून, दोघेही त्यांच्या संसारात आनंदी होती. मात्र नंतरच्या काळात त्यांच्यात दुरावा निर्माण झाल्यानेच त्यांनी घटस्फोट घेत वेगळे झाले.  फरहानचे एक्सट्रा मेरिटल अफेअरमुळेच अधुनाने फरहानला घटस्फोट दिला.  अधुना ही प्रसिद्ध हेअरस्टाइलिस्ट आहे. अधुना आता ५४ वर्षांची झाली आहे.

 

अधुनाच्या आयुष्यातही प्रेमाची एंट्री झाली आहे. अधुना फरहाननंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. अभिनेता दीनो मोरियोचा भाऊ निकोल मोरियोला अधुना डेट करत आहे.इतकेच नाही तर अधुनाच्या दोन्ही मुलीदेखील निकोलला भेटल्या आहेत.

 

अनेकदा निकोलसह अधुना तिच्या मुलींसह एन्जॉय करताना दिसते. त्यांचे खास फोटो ती सोशल मीडियावरही शेअर करते. फरहान आणि अधुना यांच्यातील नाते संपले असले तरीही दोघांमध्ये आजही मैत्री मात्र कायम आहे. दोघेही एकमेकांच्या फोटोंवर लाईक्स कमेंट्स करताना दिसतात.

 

फरहान-शिबानी दांडेकरच्या रिलेशनशीपवर जावेद अख्तर यांची होती ही पहिली प्रतिक्रिया

दरम्यान फरहानही शिबानी दांडेकरह असलेल्या अफेअरमुळे कायम चर्चेत असतो. सध्या हे कपल लिव्ह इनमध्ये राहात आहेत. शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर 2020मध्ये लग्न करणार अशी चर्चा रंगली होती. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये जेव्हा ही बातमी आली तेव्हा जावेद अख्तरने बॉम्बे टाईम्सशी बोलताना यावर आपली प्रतिक्रिया दिली होती. जावेदा यांनी या बातमीवर आश्चर्य वाटले होते आणि ते म्हणाले, मी तुमच्याकडून याविषयी ऐकतो आहे. दोन दिवसांपूर्वी मी फरहानच्या वाढदिवशी होते. याबद्दल त्याने काही सांगितले नाही.

फरहान आणि शिबानी यांच्या लग्नाबद्दल विचारले असता ते म्हणाले, "तुम्ही हे कधीही म्हणू शकत नाही, मुले या प्रकरणात खूप सिलेक्टिव्ह असू शकतात." जेव्हा त्यांना शिबानीबद्दल विचारले गेले तेव्हा ते म्हणाले होते की, मी शिबानीला बर्‍याचदा भेटलो आहे, ती चांगली मुलगी आहे.

Web Title: Farhan Akhtar's Ex Wife Adhuna Bhabani, Now Dating Nicolo Morea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.