प्रियंका चोप्राने घेतला काढता पाय अन् थंड बस्त्यात गेला फरहान अख्तरचा 'जी ले जरा' सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 09:28 AM2023-10-02T09:28:46+5:302023-10-02T09:37:08+5:30

प्रियंका चोप्रा आधी कतरिना कैफदेखील हा सिनेमा सोडल्याचं कळतंय.

Farhan akhtars film jee le zara shelved priyanka copra left the films due to some creative difference | प्रियंका चोप्राने घेतला काढता पाय अन् थंड बस्त्यात गेला फरहान अख्तरचा 'जी ले जरा' सिनेमा

प्रियंका चोप्राने घेतला काढता पाय अन् थंड बस्त्यात गेला फरहान अख्तरचा 'जी ले जरा' सिनेमा

googlenewsNext

फरहान अख्तरच्या दिग्दर्शनाखाली तयार होणार 'जी ले जरा' सिनेमा थंड बस्त्यात गेला आहे. रोड ट्रिपवर आधारित या चित्रपटात प्रियंका चोप्रा, कतरिना कैफ आणि आलिया भट मुख्य भूमिकेत दिसणार होत्या. रिपोर्टनुसार, चित्रपट बंद होण्यामागचे कारण म्हणजे प्रियांका चोप्रा आणि निर्मात्यांमध्ये झालेले मतभेद.


हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, चित्रपट बंद होण्याच्या मार्गावर आहे. याचे कारण म्हणजे प्रियंका चोप्राला या चित्रपटातील तिची भूमिका आवडली नाही. यासंदर्भात तिने निर्मात्यांशी चर्चा केली होती, दोघांमधील क्रिएटिव्ह  मतभेदांमुळे तिने हा चित्रपट सोडला. प्रियंका चोप्रा चुलत बहीण परिणीती चोप्राच्या लग्नासाठी भारतात येणार होती, त्यानंतर ती या चित्रपटाचा करार करणार होती, परंतु कामात व्यस्त असल्यामुळे ती भारतात आली नाही. मात्र, आता तिने हा चित्रपट सोडण्याचा निर्णय निर्मात्यांना कळवला आहे.

रिपोर्टनुसार, प्रियंका चोप्राच्या आधी कतरिना कैफनेही या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. निर्माते त्याच्या आणि प्रियंकाच्या जागी कियारा अडवाणी आणि अनुष्का शर्माला घेण्याचा विचार करत होते, मात्र त्यानंतर हा चित्रपट थंडबस्त्यात गेला  आहे.

काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक फरहान अख्तर म्हणाला होता. ''प्रियंका चोप्राच्या तारखांना घेऊन अनेक अडचणी निर्माण होत होत्या.  अशा परिस्थितीत काय करावे हेच समजत नाही. आता मी सर्व काही नशिबावर सोडले आहे. आता हा चित्रपट कधी बनवायचा आहे, तेव्हा बनेल.. ''

Web Title: Farhan akhtars film jee le zara shelved priyanka copra left the films due to some creative difference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.