या गोष्टीचा फरहान अख्तरला आजही होतो पश्चाताप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2018 05:02 AM2018-01-09T05:02:11+5:302018-01-09T10:32:11+5:30
फरहान अख्तरने दिग्दर्शक म्हणून त्याच्या करियरला सुरुवात केली. पण आज त्याने एक निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून स्वतःची एक ...
फ हान अख्तरने दिग्दर्शक म्हणून त्याच्या करियरला सुरुवात केली. पण आज त्याने एक निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तो एक चांगला गायक देखील आहे. त्याने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. फरहान हा प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांचा मुलगा आहे. तो खूपच लहान असताना त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. फरहानचा ९ जानेवारीला म्हणजेच आज वाढदिवस असून त्याचा जन्म मुंबईतील आहे. जावेद अख्तर यांच्या नावाचा वापर न करता त्याने बॉलिवूडमध्ये आज त्याचे प्रस्थ निर्माण केले आहे.
फरहानने खूपच कमी वयात बॉलिवूडमध्ये काम करायला सुरुवात केली. फरहान त्याच्या आईचा प्रचंड लाडका आहे. पण लहानपणापासून तो त्याच्या आईला प्रचंड घाबरायचा. त्याच्या आईने त्याला एकदा सांगितले होते की, आयुष्यात तू यश मिळवू शकला नाहीस तर तुला मी घराच्या बाहेर काढेन. त्यामुळे आयुष्यात काहीतरी बनायचे असे त्याने लहानपणीच ठरवले होते. फरहानने कॉलेजमध्ये असतानाच त्याचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले. रितेश सिडवानी हा फरहानचा खूप चांगला मित्र असल्याने त्याने त्याचे प्रोडक्शन हाऊस रितेशसोबत सुरू केले. या प्रोडक्शन हाऊसने आजवर रईस, दिल धडकने दो, जिंदगी न मिलेगी दोबारा यांसारख्या हिट चित्रपटांची निर्मिती केली आहे.
रंग दे बसंती या चित्रपटात आमिर खानने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. तुम्हाला माहीत आहे का, आमिरच्या आधी या चित्रपटाची ऑफर फरहान अख्तरला देण्यात आली होती. पण काही कारणास्तव त्याने या चित्रपटाला नकार दिला. पण आजही या गोष्टीचा फरहानला पश्चाताप वाटतो.
फरहान अख्तरच्या मते दीवार हा सगळ्यात चांगला चित्रपट आहे. फरहानला चित्रपटाविषयी प्रचंड प्रेम असल्याने तो चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी अनेक तास चित्रपट पाहण्यात घालवत असे. शोले हा चित्रपट तर त्याने आजवर ५० पेक्षा देखील अधिक वेळा पाहिला आहे.
Also Read : श्रद्धा कपूरने घेतला फरहान अख्तरपासून दूर जाण्याचा निर्णय ?