सनी देओल यांना Y दर्जाची सुरक्षा; वाचा, काय आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 10:41 AM2020-12-17T10:41:04+5:302020-12-17T11:22:33+5:30
सनी देओल यांच्या वाय दर्जा सुरक्षेमध्ये दोन कमांडो आणि 11 सुरक्षाकर्मी असतील.
भाजपा खासदार आणि अभिनेते सनी देओल यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. सनी यांनी नव्या कृषी कायद्यावर केंद्र सरकारच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिली होती. यानंतर त्यांना धमक्या मिळाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आयबीच्या रिपोर्टच्या आधारावर काल त्यांना वाय सिक्युरिटी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या नव्या सुरक्षेअंतर्गत सनी यांच्यासोबत आता 11 जवान आणि 2 कमांडो सतत राहतील.
भाजपा खासदार आणि अभिनेता सनी देओल यांनी गेल्या 6 डिसेंबरला सोशल मीडियावर पोस्ट करत दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर पहिल्यांदा प्रतिक्रिया व्यक्त केली होती. ‘ हा शेतकरी आणि सरकारमधील मुद्दा आहे. त्यामुळे या मुद्द्यामध्ये कोणीही हस्तक्षेप करु नये,’असे ट्विट सनी देओल यांनी केले होते.
— Sunny Deol (@iamsunnydeol) December 6, 2020
‘ माझी सगळ्यांना एकच विनंती आहे, या आंदोलनाचा मुद्दा हा शेतकरी आणि सरकारमधील आहे. त्यामुळे या मुद्द्यामध्ये कोणीही हस्तक्षेप करु नये. कारण आपापसात चर्चा करुन या मुद्द्यावर तोडगा निघणार नाही. मला हेदेखील चांगलंच माहित आहे की काही जण या आंदोलनाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असून या आंदोलनामध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना शेतक-यांच्या समस्येशी काहीही घेणे देणे नाहीये. ते केवळ संधीसाधू आहेत. मी आणि माझा पक्ष शेतक-यांसोबत आहोत आणि कायम मी त्यांच्या पाठिशी असेन. आपल्या सरकारने कायम शेतक-यांच्या हिताचा विचार केला आहे. त्यामुळे मला विश्वास आहे, सरकार त्यांच्याशी नीट चर्चा करुन योग्य तो तोडगा काढतील,’असेही ते म्हणाले होते.
सनी देओल शेतकरी आंदोलनावर बोलले; नेटकरी म्हणाले, धरम पुतर से ये उम्मीद ना थी!!
मात्र लोकांना ही प्रतिक्रिया पचनी पडली नव्हती. यानंतर सनी देओल सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल झाले होते.
अनेकांनी सनी देओल यांना दुटप्पी, डिप्लोमॅटिक म्हटले होते. अनेकांनी यावरून मीम्सही शेअर केले. सनीजी अब बोले, चलो कुछ तो बोले, असे म्हणत एका युजरने सनी देओल यांना डिवचले. होते. तर अन्य एका युजरने ‘शेतकरी आपली लढाई स्वत: लढेल पाजी, कदाचित तुमच्या हाडांमध्ये पाणी भरलेय,’ अशी कमेंट केली होती.