पिवळ्या साडीत खुललं फॅशन आयकॉन अमृता फडणवीसांचं सौंदर्य, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 03:27 PM2024-02-11T15:27:14+5:302024-02-11T15:29:03+5:30

नुकतेच अमृता फडणवीस या उषा काकडे यांच्या बर्थडे पार्टीत सहभागी झाल्या होत्या.

fashion icon Amrita Fadnavis in yellow saree at Usha Kakade birthday celebration in Pune, video viral | पिवळ्या साडीत खुललं फॅशन आयकॉन अमृता फडणवीसांचं सौंदर्य, व्हिडीओ व्हायरल

पिवळ्या साडीत खुललं फॅशन आयकॉन अमृता फडणवीसांचं सौंदर्य, व्हिडीओ व्हायरल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सामाजिक कार्य, गायन, मॉडेलिंग अशा विविध क्षेत्रांत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी केलेली फॅशन कायम ट्रेंड होत असते. सोशल मीडियावरही त्या प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेक कार्यक्रमांनाही त्या उपस्थिती दर्शवतात. नुकतेच अमृता फडणवीस या उषा काकडे यांच्या बर्थडे पार्टीत सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांच्या आऊटफिटने लक्ष वेधलं.

 उषा काकडे यांच्या बर्थडे पार्टीत पिवळ्या रंगाची साडी अमृता फडणवीस यांनी नेसली होती. त्यावर त्यांनी नाजूक डिझायनर मंगळसूत्र घातलं होतं. या सुंदर साडीवर कानात मोठे झुमके घालून आणि कपाळावर टिकली लावून त्यांनी आपला लूक पूर्ण केला. तर यावेळी त्यांनी आपले केस मोकळे सोडले होते. तर, हलका आणि शायनी मेकअप केला होता. याचे काही व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. 

 

अमृता फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींना बर्थडे पार्टीत खास आमंत्रण देण्यात आलं होतं.  बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आणि झीनत अमान यांनीही हजेरी लावली. सर्वांच्या नजरा त्यांच्याकडेच खिळलल्या होत्या. तर मराठमोळी लाडकी जोडी आर्ची व परश्या म्हणजेच आकाश ठोसर व रिंकू राजगुरू यांनीही एकत्र हजेरी लावली आणि चाहत्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

अमृता फडणवीस या बँकर आहेत. मात्र,अमृता यांना गाण्याचीही विशेष आवड आहे. त्यांनी अनेक गाण्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अमृता फडणवीस यांनी यापूर्वी देखील अनेक भक्तीपर गीते गायली आहेत. नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहलेलं आणि अमृता फडणवीसांनी गायलेलं 'राम भजन'  प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्याला सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांनी संगीत दिलं. तसेच अमृता फडणवीस या राजकारणात थेट सक्रिय नसल्या तरी त्या कायम पती देवेंद्र फडणवीस यांची खंबीरपणे साथ देताना दिसून येतात. 
 

Web Title: fashion icon Amrita Fadnavis in yellow saree at Usha Kakade birthday celebration in Pune, video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.