fatima sana shaikh : 'दंगल गर्ल' फातिमाला आहे मेंदुचा विकार, कसा केला आजाराशी सामना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 01:37 PM2022-11-30T13:37:52+5:302022-11-30T13:39:49+5:30
'दंगल' फेम फातिम सना शेख बद्दल एक वेगळीच माहिती समोर आली आहे. फातिमा एका गंभीर आजाराशी झुंज देत आहे.
Fatima Sana Shaikh : 'दंगल' फेम फातिम सना शेख बद्दल एक वेगळीच माहिती समोर आली आहे. फातिमा एका गंभीर आजाराशी झुंज देत आहे. तिने या आजाराबद्दल मोठा खुलासा केला आहे. या आजाराचे नाव Epilepsy 'एपिलेप्सी' म्हणजे अपस्मार असे आहे. या आजारामुळे करिअर थांबते की काय अशी चिंता ही तिला सतावत होती. 'एपिलेप्सी'चा त्रास फातिमा ला नेमका कसा झाला हे तिने सांगितले आहे.
विमानातच आला अटॅक
फातिमा सना शेख Bollywood बॉलिवुडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. तिच्याकडे बघुन असे वाटणार ही नाही की तिला कोणता गंभीर आजार असेल. तिने एका मुलाखतीत सांगितले, 'एकदा विमानात असतानाच मला 'एपिलेप्सी'चा Attack अटॅक आला होता. त्वरित मला विमानात वैद्यकीय सेवा मिळाली. यानंतर मी बरेच दिवस रुग्णालयात उपचार घेत होते.' ती पुढे म्हणाली, 'मला आतापर्यंत पाच वेळेस असा अटॅक आला आहे. अशा परिस्थितीत मी पूर्णपणे एकटी होते. माझ्याजवळ काळजी घेण्यासाठी कोणीच नव्हते. 'या आजाराविषयी तिने सांगितले, 'एपिलेप्सीने माझे जीवन आणि करिअर दोन्ही थांबवले होते. माझे नशिब मी यातुन वाचले. मी आता एकटी प्रवास करु शकत नाही. नेहमी मला कोणी ना कोणी सोबत हवे असते.'
काम न मिळण्याची भीती
फातिमा म्हणाली, जेव्हा जगासमोर माझ्या या आजाराचा खुलासा झाला तेव्हा मला भीती होती की आता मला कोणी काम देणार नाही. मी हे सत्य लपवून ठेवले नाही. पण मला कधी सांगायची संधी मिळाली नाही. मला या आजाराविषयी माहिती घ्यायला वेळ लागला. आजार हा एखाद्या कलंक सारखा असतो. मला इतरांच्या नजरेत स्वत:ला कमजोर होऊ द्यायचे नव्हते. मला मेंदुचा विकार आहे हे मला स्वीकारायची इच्छाच नव्हती.'
फातिमा आता या आजाराबद्दल खुलेपणाने बोलत आहे. कारण तिला याविषयी जागरुकता निर्माण करायची आहे.
एपिलेस्पी म्हणजे काय ?
एपिलेस्पी म्हणजेच अपस्मार हा दीर्घकालीन मेंदूचा विकार आहे. यात मेंदुमध्ये असाधारण क्रिया होते ज्यामुळे असामान्य वेदना जाणवतात. तसेच शुद्ध कमी होते.