Fatima Sana Shaikh:दंगल गर्ल फातिमा सना शेखला झालाय हा गंभीर आजारा, म्हणाली- मी थेट हॉस्पिटलमध्ये....
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 05:54 PM2022-11-14T17:54:00+5:302022-11-14T18:50:55+5:30
'दंगल' गर्ल फातिमा सना शेख म्हणाली, मी कोणत्याही दिग्दर्शकासोबत काम सुरू करण्यापूर्वी माझ्या आजाराबद्दल सांगते.
Fatima Sana Shaikh Epilepsy: बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेखने 'दंगल' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये धमाका केला आणि त्यानंतर तिने एकापेक्षा एक चित्रपट दिले. त्याचबरोबर अलीकडे फातिमा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिने नुकताच खुलासा केला आहे की तिला एका गंभीर आजाराने ग्रासले आहे, हा आजार एपिलेप्सी आहे. फातिमा 'अपस्मार' म्हणजे एपिलेप्सी आजाराने ग्रस्त आहे.
नोव्हेंबर हा राष्ट्रीय 'एपिलेप्सी जागरूकता महिना' आहे. या निमित्ताने अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर आपल्या आजाराबद्दल माहिती दिली. 'दंगल गर्ल' फातिमा सना शेखने इन्स्टाग्राम स्टोरीवर एपिलेप्सीसंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. तिने या गंभीर आजाराचा सामना कसा केला हे सांगितले. यासोबतच तिने लोकांना जागरुक करण्यासाठी एपिलेप्सीशी संबंधित खुलासे केले आहेत आणि तिचा अनुभवही सांगितले आहेत.
'दंगल'च्या ट्रेनिंगदरम्यान झालं आजाराचं निदान
फातिमाने सांगितले की, जेव्हा ती दंगलचे शूटिंग करत होती. तेव्हा त्याला या आजाराचं निदान झालं. दंगलच्या विशेष ट्रेनिंगदरम्यान तिला अपस्माराचा झटका आला. ट्रेनिंग घेत असताना मला झटका आला आणि मी थेट हॉस्पिटलमध्ये गेलो. सुरुवातीला मला विश्वासच बसत नव्हता की मला असा आजार होऊ शकतो पण आता मी त्याच्यासोबत जगायला शिकले आहे. तिला या आजाराला स्वीकार करायला पाच वर्ष लागली.
काम करण्यापूर्वी दिग्दर्शकाला आजारपणाबद्दल सांगते
आता मी कोणत्याही दिग्दर्शकासोबत काम करतो, त्यामुळे काम सुरू करण्यापूर्वी माझ्या आजाराबद्दल सांगते. मी आधीच सांगितले आहे की मला एपिलेप्सी आहे. दिग्दर्शक नेहमीच मला साथ देतो आणि माझी अडचण समजून घेतात.
फातिमाने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर 'आस्क मी एनीथिंग' सत्र सुरू केले होते. या सत्रादरम्यान एका चाहत्याने फातिमाला विचारले की, तुम्ही एपिलेप्सीसारख्या आजाराला कसे सामोरे जाता, यावर उत्तर देताना अभिनेत्री म्हणते, 'माझं कुटुंब माझ्यासोबत आहे. माझे मित्रमैत्रिणी आणि माझी पेट्स बिजली यांची साथ मला आहे. त्यामुळे मला हिंमत मिळते. काही वर्षात असे बरेच दिवस गेले जे खूप त्रासदायक होते. त्याच बरोबर असे काही दिवस होते जे खूप चांगले होते.