फातिमा सना शेखने राजकुमार हिराणींना केला मेसेज, शाहरूखबाबत केली 'ही' मागणी....
By अमित इंगोले | Published: October 29, 2020 09:57 AM2020-10-29T09:57:42+5:302020-10-29T10:04:28+5:30
जेव्हा फातिमाला समजलं की, शाहरूख खान आता राजुकमार हिराणींसोबत सिनेमा करणार आहे तर तिने हिराणींना मेसेज केला आणि तिचा सिनेमासाठी विचार करण्याची मागणी केली.
शाहरूख खानच्या आगामी सिनेमाची त्याचे फॅन्स आतुरतेने वाट बघत आहेत. तेच अभिनेत्री फातिमा सना शेख सुद्धा तिच्या फेव्हरेट अभिनेत्याच्या अपकमिंग प्रोजेक्टबाबत एक्सायटेड आहे. जेव्हा फातिमाला समजलं की, शाहरूख खान आता राजुकमार हिराणींसोबत सिनेमा करणार आहे तर तिने हिराणींना मेसेज केला आणि तिचा सिनेमासाठी विचार करण्याची मागणी केली.
फातिमाने ई-टाइम्सला सांगितले की, 'मी शाहरूख खानची मोठी फॅन आहे. मला माहीत नाही क, त्यांच्यात काय जादू आहे. पण मी त्यांच्या सिनेमाची आतुरतेने वाट बघत असते. मी कुठेतरी वाचलं की, ते राजकुमार हिराणीसोबत सिनेमा करणार आहे. मग विचार आला की, हे मस्तय, दोघेही माझे फेव्हरेट आहेत'.
राजकुमार हिराणींना केला मेसेज
फातिमाने सांगितले की, 'मी राजू सरला मेसेज केला की, जर तुम्ही कास्टिंग करत असाल तर मी उपलब्ध आहे. मला आशा आहे की, ते माझा विचार करतील'. फातिमाने हेही सांगितलं की, ती नेहमीच फिल्ममेकर्सना मेसेज करत राहते आणि जुन्या आठवणी शेअर करत राहते.
भन्साळीचीही आहे फॅन
फातिमा 'सूरज पे मंगल भारी' या दिलजीत दोसांझ आणि मनोज वाजपेयीच्या सिनेमात दिसणार आहे. अभिनेत्रीनुसार, 'मला पिरियड सिनेमे, गॅंगस्टर बेस्ड मुव्हीज आवडतात. मला संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमातील दुनियेवर प्रेम आहे. माझ्यासाठी जॉनरपेक्षा दिग्दर्शक महत्वाचा आहे'.
बायोपिकवरही करू शकते काम....
बायोपिक्सच्या विषयाबाबत फातिमा म्हणाली की, 'आपल्या आजूबाजूला अनेक चांगल्या कथा आहेत. मला आवडली एखादी कथा तर का नाही करणार? बायोपिक कुणावरही बनवला जाऊ शकतो. पण जर चांगल्या प्रकारे दाखवला गेला नाही तर काही अर्थ नाही. मला जबरदस्तीने सिनेमा करायचा नाही. जर कथा चांगली असेल तर कदाचित करेनही'.