फातिमा सना शेखने केला खुलासा; ३ वर्षांची असताना झालं शोषण, कास्टिंग काउचचाही केला सामना
By अमित इंगोले | Published: October 31, 2020 11:03 AM2020-10-31T11:03:13+5:302020-10-31T11:06:24+5:30
फातिमा सना शेखने पिंकविलाला देण्यात आलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'मला अनेकदा बोलण्यात आलं होतं की, तू कधीही हिरोईन होऊ शकत नाही.
बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेखने सांगितले की, तिला तिच्या करिअरमध्ये अनेक रिजेक्शनचा सामना करावा लागला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितले की, कशाप्रकारे तिला हिरोईन बनण्यासाठी योग्य समजलं गेलं नाही. कारण ती दीपिका पादुकोण आणि ऐश्वर्या रायसारखी दिसत नाही. यासोबतच फातिमा सना शेखने लैंगिक शोषण ते कास्टिंग काउचबाबत मोकळेपणाने बोलली.
'मला बोलण्यात आलं की तू हिरोईन होऊ शकत नाही'
फातिमा सना शेखने पिंकविलाला देण्यात आलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'मला अनेकदा बोलण्यात आलं होतं की, तू कधीही हिरोईन होऊ शकत नाही. तू दीपिका पादुकोण आणि ऐश्वर्या रायसारखी दिसत नाही. तू कशी हिरोईन बनशील? अशाप्रकारे लोकांनी मला कमी लेखलं. पण आता जेव्हा मी मागे वळून बघते तेव्हा मला वाटतं की, ते बरंच योग्य होतं. हे सुंदरतेचं मानक आहे की, एक हिरोईन बनण्यासाठी असं झालं पाहिजे'. (फातिमा सना शेखने राजकुमार हिराणींना केला मेसेज, शाहरूखबाबत केली 'ही' मागणी....)
कास्टिंग काउचचा केला सामना
फातिमा सना शेख पुढे सांगितलं की, 'मी माझ्या करिअरच्या सुरूवातीच्या दिवसात सेक्सिज्मचा सामना केला. तिने हा खुलासा केला की, समाजात सेक्सिज्म इतका जास्त आहे की, जेव्हा मी तीन वर्षांची होते तेव्हा माझ्यासोबत छोडछाड झाली होती. माझा काही अशा लोकांशी सामना झाला आहे जे मला म्हणाले की, नोकरी मिळवण्याची एकमात्र पद्धत सेक्स आहे. याच कारणामुळे माझ्या हातून अनेक सिनेमे निघून गेले'.
फातिमाचा सना शेखचा येणारा सिनेमा
वर्क फ्रंटबाबत सांगायचं तर फातिमा सना शेख लवकरच दिग्दर्शक अनुराग बसुच्या 'लूडो' सिनेमात आणि 'सूरज पे मंगल भारी' सिनेमात दिसणार आहे. फातिमाने आमीर खानच्या 'दंगल' सिनेमातून डेब्यू केलं होतं. हा आतापर्यंतच्या सर्वात जास्त गाजलेल्या सिनेमापैकी एक आहे. या सिनेमातील तिच्या कामाचं चांगलंच कौतुक झालं होतं. दरम्यान फातिमाने आतापर्यंत 'इश्क', 'चाची ४२०', 'वन टू का फोर', 'बडे दिलवाला' सारख्या सिनेमात चाइल्ड आर्टिस्ट म्हणून दिसली आहे.