आमिरसोबत लिंकअपच्या चर्चांमुळे दुखावली होती फातिमा सना शेख; म्हणाली, "असं वाटत होतं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 13:01 IST2025-04-09T13:00:40+5:302025-04-09T13:01:13+5:30
'दंगल' नंतर काही वर्षांनी आमिर आणि फातिमाच्या अफेअरची जोरजार चर्चा झाली.

आमिरसोबत लिंकअपच्या चर्चांमुळे दुखावली होती फातिमा सना शेख; म्हणाली, "असं वाटत होतं..."
बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh) 'दंगल' सिनेमातील भूमिकेमुळे ओळखली जाते. आमिर खानच्या (Aamir Khan) या सिनेमात तिने गीता फोगाटची भूमिका साकारली. फातिमाने बालकलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात केली होती.'चाची ४२०', 'इश्क' सिनेमांमध्ये तिने छोट्या मुलीचं काम केलं आहे. नंतर 'दंगल' मध्ये ती थेट मुख्य भूमिकेत झळकली. दंगल नंतर काही वर्षांनी आमिर आणि फातिमाच्या अफेअरची जोरजार चर्चा झाली. आमिर इतक्या लहान मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे वाचून सर्वांना धक्काच बसला होता. या चर्चांवर फातिमाने उत्तर दिलं होतं.
काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत फातिमा म्हणाली होती की, "हो आधी माझ्यावर याचा परिणाम व्हायचा. मला खूप वाईट वाटायचं. कारण मी इतक्या मोठ्या स्तरावर कधीच अशा गोष्टींना सामोरी गेलेली नाही. असे लोक ज्यांना मी कधी भेटलेही नाही ते माझ्याबद्दल अशा गोष्टी छापत आहेत. खरं जाणून न घेताच ते असं बोलत आहेत. जे लोक हे वाटत असतील त्यांना तर असंच वाटणार की मी चांगली व्यक्ती नाही. मला त्यांना असं म्हणावं वाटतं की, मला विचारा मी उत्तर देते. चाहत्यांनी माझ्याबद्दल गैरसमज करुन घेऊ नये असंच मला वाटतं. पण नंतर मी त्याकडे दुर्लक्ष करायला शिकले. तरी कधी कधी मला या गोष्टींमुळे दु:ख होतं."
आमिर सध्या गौरी स्प्रॅटला डेट करत आहे. दीड वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांमध्ये १४ वर्षांचं अंतर आहे. गौरीचा सिनेसृष्टीशी कोणताही संबंध नाही. तिला पहिल्या पतीपासून ८ वर्षांचा मुलगाही आहे. फातिमा सना शेख आगामी 'मेट्रो इन दिनो' सिनेमात दिसणार आहे. तसंच 'आप जैसा कोई' सिनेमात ती आर माधवनसोबत झळकणार आहे.