VIDEO : एअरपोर्ट दिसताच कार्तिक आर्यनच्या मागे धावल्या तरूणी, गुलाब देऊन केलं प्रपोज आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 14:30 IST2022-03-22T14:27:45+5:302022-03-22T14:30:12+5:30
Kartik Aaryan : एक व्हिडीओ समोर आला असून त्यात कार्तिक आर्यन मुंबई एअरपोर्टवर दिसला तर दोन तरूणी त्याचा पाठलाग करू लागल्या. त्यांच्या हातात गुलाबाची फुलं आहेत.

VIDEO : एअरपोर्ट दिसताच कार्तिक आर्यनच्या मागे धावल्या तरूणी, गुलाब देऊन केलं प्रपोज आणि मग...
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनबाबत (Kartik Aaryan) तरूणींमध्ये खूप जास्त क्रेझ आहे. त्याच्या फीमेल फॅन्सचे अनेक कारनामे आधीही बघायला मिळाले. तरूणींनी त्याला कार्तिकला प्रपोज करणं असो वा त्याच्या नावाचा टॅटू काढणं असो कार्तिक आर्यनबाबतची तरूणींमधील क्रेझ कधी लपली नाहीये. मुंबई एअरपोर्टवर पुन्हा एकदा असंच काहीसं बघायला मिळालं.
एक व्हिडीओ समोर आला असून त्यात कार्तिक आर्यन मुंबई एअरपोर्टवर दिसला तर दोन तरूणी त्याचा पाठलाग करू लागल्या. त्यांच्या हातात गुलाबाची फुलं आहेत. ते त्यांना कार्तिकला द्यायचे आहेत. कार्तिक पुढे चालतो आहे आणि तरूणी त्याच्या मागे धावत आहेत. आधी तर कार्तिक लाजला, मग त्याने फॅन्सकडून गुलाब घेतले.
पिंक स्वेटशर्टमध्ये कार्तिक फारच हॅंडसम दिसत आहे. कार्तिकला गुलाब देताना एक तरूणी म्हणाली की, हे तुझ्यासाठी आहे. कार्तिकला प्रपोज करत असलेल्या फॅन्सना पाहून फोटोग्राफर्सही त्यांची गंमत करत होते. एका फोटोग्राफर म्हणाला की, चांगल्याने गुडघ्यावर बसून प्रपोज करा. दुसरी तरूणी कार्तिकला सांगते की, आज तिचा वाढदिवस आहे.
कार्तिक आर्यनच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर त्याने काही सिनेमे लाइनअप आहेत. कार्तिकच्या शहजादा सिनेमाची आतुरतेने वाट बघितली जात आहे. यात तो क्रिकेटरच्या भूमिकेत दिसेल. शहजादा ४ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. तसेच कार्तिक भुल भुलैय्या २ आणि फ्रेडीमध्ये दिसणार आहे.