स्त्रीवादी चित्रपट नेहमीच भावतात - ईला अरुण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2017 11:30 AM2017-04-04T11:30:38+5:302017-07-31T12:56:30+5:30

गायिका, अभिनेत्री, गीतकार आणि लेखिका अशा विविध जबाबदाऱ्या ईला अरुण यांनी समर्थपणे पेलल्या. बेगम जान या चित्रपटातून त्या पुन्हा ...

Feminist films are always meant - Ella Arun | स्त्रीवादी चित्रपट नेहमीच भावतात - ईला अरुण

स्त्रीवादी चित्रपट नेहमीच भावतात - ईला अरुण

googlenewsNext
यिका, अभिनेत्री, गीतकार आणि लेखिका अशा विविध जबाबदाऱ्या ईला अरुण यांनी समर्थपणे पेलल्या. बेगम जान या चित्रपटातून त्या पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येण्यास सज्ज झाल्या आहेत. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेविषयी त्यांच्याशी साधलेला हा दिलखुलास संवाद. 

या चित्रपटाचा ट्रेलर खूपच प्रभावशीला वाटला तुमची या चित्रपटात काय भूमिका आहे ?
स्त्रीवादी विषयांवरील चित्रपट मला नेहमीच भावतात. भारत- पाकिस्तान यांच्यामध्ये ज्यावेळी फाळणी झाली त्यावेळी  अनेक घरांची यात विभागणी झाली. यात काहींचे घरं भारतात राहिले तर काहींची पाकिस्तानात गेली. याचा आधार घेते एका काल्पनिक विषयावर हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. भारत पाकिस्तान फाळणी दरम्यान एका कोठ्याचे ही फाळणी होते. या कोठ्याची मालकीण विद्या बालन असते. कोठ्यावर आलेल्यावर विद्या पहिला हात पकडते तो अम्माचा. या अम्माची व्यक्तीरेखा मी साकारत आहे. तशी मी या  मी या चित्रपटात एका सरप्राईज एलीमेंट आहे. अम्मा ही विद्याच्या कमजोर क्षणाची ताकद असते. आम्मा आणि विद्याचे भावनिकसंबंध असतात. हा चित्रपट तसा माझ्यासाठी एक युटर्न होता. शामबेगनल यांच्या मंडी याचित्रपटाव्दारे मी इंडिस्ट्रीत पदार्पण केले होते. जवळपास 35 वर्षांनंतर स्त्रीवादी चित्रपटात मी काम करते. त्यामुळे या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान मी फ्लॅशबॅक मध्ये गेली होती. 

ही भूमिका साकारणे तुमच्यासाठी किती आव्हानात्मक होते ?
वय आणि अनुभवानुसार तुमच्यावरची जबाबदारी वाढली असते. जेव्हा तुम्ही एखादा चित्रपटात त्याचित्रपटातील सगळ्यात प्रौढ व्यक्तीची भूमिका साकरता तेव्हा तुमचा अनुभव ही तेवढाच हवा असतो. याचित्रपटात मी बंदूक उचलतना आणि मारामारी करताना तुम्हाला दिसणार आहे. 

शादी के साईड इफेक्ट के बाद जवळपास 3 वर्षांनतंर तुम्ही चित्रपटात दिसतात एवढा मोठ्या गॅप का घेतलात ?
मला कधीच फरक नाही पडत की किती वर्षानंतर मोठ्या पडद्यावर परत ते आहे याचा. मी कधीच काम मागायला कोणाकडे जात नाही. मात्र माझ्याकडे येणाऱ्या भूमिका मात्र मी नक्की स्वीकारते. मी कामात इतकी व्यस्त असते की पडद्यावर आले कधी आले आणि कधी गेले याकडे फारसे लक्ष देत नाही.  या 3 वर्षांच्या कालखंडामध्ये मी 2 चित्रपट केले आहे. जे अजून प्रदर्शित झाले नाही आहेत. यातला एका चित्रपट आहे गवल्लू. हा चित्रपटची कथा जरा हटके आहे आणि यातली माझी भूमिकाही जरा वेगळी आहे. जूनपर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.  

तुम्ही स्वत: गायिका आहात आजच्या जमान्यातील संगीताबद्दल तुम्हाला काय वाटते ?
सगळे चांगले काम करत आहेत. अर्जित सिंगसारखे व्हर्सस्टाईल गायक इंडस्ट्रीत आहेत. अनेक नवीन चांगले आवाज कानावर ऐकायला येत आहेत. तसेच  आजचा तरुणाईला ज्या प्रकारते संगीत आवडते तेच चित्रपटांमध्ये ऐकायला मिळते. 

तुमचा ‘व्होट फॉर घागरा’ या अल्बमला रसिकांच्या भरघोस प्रतिसाद मिळाला तो अनुभव कसा होता ? 
मी खूप रॅप केले आहे आणि या अल्बममध्ये सुद्धा मी रॅप म्युझिकचा वापर केला आहे. 7 मिनिटांचा रॅप केला आहे आणि त्याचे बिट्स ही मॉर्डन आहेत. मला नहेमीच काही तरी इनोवेटिव्ह आणि नवीन करायला आवडते.

Web Title: Feminist films are always meant - Ella Arun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.