'फेविक्विक दादी' पुष्पा जोशींचे निधन, वयाच्या ८५व्या वर्षी बॉलिवूडमध्ये केले होते पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 03:03 PM2019-11-29T15:03:34+5:302019-11-29T15:04:43+5:30
Fevikwik Ad Fame Dadi Pushpa Joshi: पुष्पा जोशी यांनी वयाच्या ८५ वर्षी 'रेड' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
वयाच्या ८५ वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री पुष्पा जोशी यांचे २६ नोव्हेंबरला निधन झाले. त्यांनी अजय देवगण अभिनीत व २०१८ साली प्रदर्शित झालेल्या 'रेड' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मागील आठवड्यात घरात घसरून पडल्यामुळे त्यांना फॅक्चर झाले होते. त्यानंतर त्यांना मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांचं ऑपरेशनदेखील पार पडलं होतं. मात्र मंगळवारी त्यांचे निधन झाले.
पुष्पा जोशी यांच्या निधनावर दुःख व्यक्त करत चित्रपट निर्माते राजू कुमार गुप्ता यांनी ट्विटवर त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी लिहिले की, पुष्पा जोशी जी यांच्या निधनाचं वृत्त ऐकून खूप वाईट वाटले. माझ्या दिग्दर्शनच्या करियरमधील एक मुख्य आकर्षणमधील रेड चित्रपटात तुम्ही तुमचे अभिनय कौशल्य सादर केले होते. तुम्ही जिथे कुठे असाल तिथे तुम्ही आनंदी असाल आणि आनंद पसरवाल आजी जी. आम्हाला तुमची आठवण येईल. तुमच्या आत्म्यास शांती मिळो.
Very sad to hear about the passing away of Pushpa Joshi ji. One of the highlights of my directing career was watching you perform in RAID. You were a live wire on and off the sets. Wherever you are you will be smiling and spreading happiness Dadi ji. We will miss you. RIP. pic.twitter.com/TMleLe1oJA
— Raj Kumar Gupta (@rajkumar_rkg) November 27, 2019
आपल्या करियरच्या अखेरच्या वेळी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या पुष्पा जोशी यांनी रेड चित्रपटात अम्मा जींची भूमिका निभावली होती.
शेवटच्या त्या फेविक्विकच्या एका जाहिरातीत स्वॅगवाल्या आजीच्या अंदाजात दिसल्या होत्या.