सैफ अली खान आजही या गोष्टीचे क्रेडिट त्याच्या एक्स वाईफला देतो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 15:24 IST2020-04-14T15:09:42+5:302020-04-14T15:24:27+5:30
सध्या सैफ पत्नी करिना आणि मुलगा तैमूरसोबत क्वालिटी टाईम स्पेंट करतो आहे.

सैफ अली खान आजही या गोष्टीचे क्रेडिट त्याच्या एक्स वाईफला देतो
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आपल्या सिनेमा इतकाच पर्सनल लाईफला घेऊन देखील चर्चेत असते. सध्या सैफ पत्नी करिना आणि मुलगा तैमूरसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करतो आहे.
काही महिन्यांपूर्वी दिलेल्या एका मुलाखती दरम्यान सैफने आपल्या भूतकाळाबाबत अनेक खुलासे केले होते. बॉलिवूड बबलच्या रिपोर्टनुसार एका मुलाखतीत सैफने अमृता सिंगचे खूप कौतूक केले आहे. सैफ म्हणाला, मी घरातून पळून 20 व्या वर्षी लग्न केले होते. या गोष्टीचे क्रेडिट अमृताला जाते कारण त्यावेळी ती एकमेव अशी व्यक्ति होती जिने मला फॅमिलीला, कामाला आणि बिझनेसला गंभीरतेने घेण्यास शिकवले. अमृतासोबत घटस्फोट घेतल्यानंतरही दोघांमध्ये मैत्रिचे नातं अजूनही आहे.
सैफ आणि अमृता सिंग यांचे लग्न 1991 मध्ये झाले होते. या लग्नाला सुरुवातीला सैफच्या घरातून विरोध होता. सैफ आणि अमृता यांच्यामध्ये अमृता 12 वर्षांनी मोठी आहे. पण सैफ अमृताच्या प्रेमात आकंठ बुडाला असल्याने त्याने तिच्यासोबत लग्न केले.
पण लग्नाच्या काही वर्षांनंतर त्यांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला. त्यांचा घटस्फोट 2004 मध्ये झाला आणि 2012 मध्ये सैफने करिनासोबत लग्न केले. सैफ आणि करिनाची जोडी त्यांच्या फॅन्सना प्रचंड आवडते.