दीपिका रणवीरला म्हणते, मला तुझा अभिमान वाटतो...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 10:05 AM2019-04-07T10:05:08+5:302019-04-07T10:07:34+5:30

दीपिका पादुकोण व रणवीर सिंग ही बॉलिवूडची जोडी ‘मेड फॉर इच अदर’ जोडी आहे. या जोडप्याचे एकमेकांवर किती प्रेम आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. परस्परांना  प्रोत्साहित करण्याची एकही संधी हे कपल सोडत नाही.

film 83 deepika padukone commented on ranveer singh and kapil dev practice video | दीपिका रणवीरला म्हणते, मला तुझा अभिमान वाटतो...!!

दीपिका रणवीरला म्हणते, मला तुझा अभिमान वाटतो...!!

googlenewsNext
ठळक मुद्दे‘83’ या  सिनेमात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे.

दीपिका पादुकोणरणवीर सिंग ही बॉलिवूडची जोडी ‘मेड फॉर इच अदर’ जोडी आहे. या जोडप्याचे एकमेकांवर किती प्रेम आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. परस्परांना  प्रोत्साहित करण्याची एकही संधी हे कपल सोडत नाही. अलीकडे रणवीर सिंगने आपल्या सोशल अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओत रणवीर दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव याच्याकडून क्रिकेटचे धडे घेत आहे. दीपिकाने हा व्हिडीओ पाहिला आणि त्यावर कमेंट करण्याचा मोह तिला आवरता आला नाही. ‘तू जितका शिकू शकतोस, तितका शिक़ कारण हे दिवस पुन्हा परत येणार नाहीत. मला तुझा अभिमान वाटतो,’ असे दीपिकाने रणवीरसाठी लिहिले.पत्नीचे इतके प्रेरणादायी शब्द ऐकून रणवीरचा ऊर भरून आला नसेल तर नवल....


  ‘83’ या  सिनेमात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. तर माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा वठविणार आहे.   साहिल खट्टर  माजी यष्टीरक्षक सैय्यद किरमानी याची भूमिका साकारणार आहे. पंजाबी अभिनेता एमी विर्कही या चित्रपटामध्ये झळकणार आहे. यात चिराग पाटील वडील संदीप पाटील यांची भूमिका साकारणार आहे. तर मान सिंग यांच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी दिसणार आहे. क्रिकेटर सुनील गावस्कर यांची भूमिका अभिनेता ताहिर भसीन साकारणार आहे. 


कबीर खान दिग्दर्शित हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. हीच विजयगाथा चित्रपटरूपात पडद्यावर येणार आहे.  

Web Title: film 83 deepika padukone commented on ranveer singh and kapil dev practice video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.