‘अब तक छप्पन’च्या सहाय्यक दिग्दर्शकाची आत्महत्या, इमारतीवरून उडी घेत संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 09:41 AM2018-07-12T09:41:06+5:302018-07-12T09:41:49+5:30
‘अब तक छप्पन’ या चित्रपटाचा सहाय्यक दिग्दर्शक आणि स्क्रिप्ट राईटर रविशंकर आलोक याने बुधवारी इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली.
‘अब तक छप्पन’ या चित्रपटाचा सहाय्यक दिग्दर्शक आणि स्क्रिप्ट राईटर रविशंकर आलोक याने बुधवारी इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली.
रविशंकरकडे गेल्या वर्षभरापासून काम नव्हते. तो भाड्याच्या घरात राहायचा. भाड्याचे पैसे द्यायलाही त्याच्याकडे पैसे नव्हते. भावाने दिलेल्या माहितीनुसार, रविशंकर गेल्या काही महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये होता. याच डिप्रेशनमधून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
Mumbai: 32-year-old man allegedly committed suicide by jumping off from the terrace of his apartment in Versova at around 2 pm yesterday. Police have registered an Accidental Death Report (ADR). Further investigation underway pic.twitter.com/8ebOsMsHx0
— ANI (@ANI) July 11, 2018
बुधवारी दुपारी २ च्या सुमारास वर्सोवा येथील राहत्या अपार्टमेंटच्या छतावरून त्याने उडी घेतली. दरम्यान त्याच्याकडून कुठलीही सुसाईड नोट सापडली नाही. तूर्तास पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
२००४ मध्ये ‘अब तक छप्पन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रविशंकरने दिग्दर्शक शिमित अमीनसोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. हा चित्रपट हिट राहिला होता.