सेक्स एज्युकेशनसाठी मुलांना ही फिल्म दाखवतायत शिक्षक, खुद्द अभिनेत्रीनंच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 07:34 PM2023-02-02T19:34:04+5:302023-02-02T19:35:10+5:30

फिल्म रिलीज झाल्यानंतर, रकुल प्रीत सिंगने सांगितले की, त्यांना जबर्दस्त रिस्पॉन्स मिळत आहे. फिल्म पाहणाऱ्यांमध्ये पुरुषांसोबतच महिलाही आहेत.

film chhatriwali spreading awareness about sex education among people says rakul preet singh | सेक्स एज्युकेशनसाठी मुलांना ही फिल्म दाखवतायत शिक्षक, खुद्द अभिनेत्रीनंच सांगितलं

सेक्स एज्युकेशनसाठी मुलांना ही फिल्म दाखवतायत शिक्षक, खुद्द अभिनेत्रीनंच सांगितलं

googlenewsNext

दोन आठवड्यांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्म जी5 वर रिलीज झालेल्या फिल्म छतरीवालीला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. समीक्षकांसह प्रेक्षकही रकुल प्रीत सिंगच्या या फिल्मचे कौतुक करत आहेत. ही फिल्म सेक्स एज्युकेशनच्या मुद्द्यावर तयार करण्यात आली आहे. या फिल्ममध्ये वैवाहिक संबंधांमध्ये गर्भनिरोधकाचा वापर करणे ही केवळ महिलांचीच नाही, तर पुरुषांचीही जबाबदारी आहे, असा मेसेज देण्यात आला आहे.

फिल्म रिलीज झाल्यानंतर, रकुल प्रीत सिंगने सांगितले की, त्यांना जबर्दस्त रिस्पॉन्स मिळत आहे. फिल्म पाहणाऱ्यांमध्ये पुरुषांसोबतच महिलाही आहेत. रकुलने दिलेल्या माहितीनुसार, तिला जेव्हा शेवटचे समजले, तोवर या फिल्मला ओटीटीवर 150 मिलियन व्ह्युइंग अवर्स मिळाले होते.

...ही दिलासादायक गोष्ट -
रकुलने म्हटले आहे, की लोक फिल्म बघत आहेत. याहून अधिक दिलासादायक गोष्ट म्हणजे छतरीवाली फिल्मशी संबंधित मला येणारे मेसेज. जे मला सोशल मीडिया आणि फोनवर मिळत आहेत. मला मेसेज करणाऱ्यांमध्ये अधिकांश महिला आहेत. काही टीचर्सनीदेखील मला मेसेज पाठवले आहेत की, त्यांनी त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांना छतरीवाली दिखावली अथवा बघायला सांगितली आहे. जेणेकरून सेक्स एज्युकेशन संदर्भात त्यांचे गैरसमज दूर होतील. 

रकुल म्हणाली, हे मसेजस खरोखरच मनाला दिलासा देणारे आहेत. ही फिल्म अथवा चित्रपट योग्य भावनेने घेतला गेला आहे. ती म्हणाली या फिल्ममध्ये काम करताना माझ्यावर कसलाही दबाव नव्हता. तर मी मला जबाबदारीची जाणीव होत होता. कारण निर्माता-दिग्दर्शकाने माझ्यावर एवढ्या चांगल्या कथेसाठी विश्वास ठेवला होता.

या वर्षातही पाच चित्रपट -
रकुल प्रीत सिंग बॉलीवुड सोबतच साऊथच्या फिल्म्समध्येही काम करते. यावर्षात तिचे पाच चित्रपट प्रदर्षित होत आहेत. यात कमल हासनचा चर्चित चित्रपट इंडियनचा सिक्वल इंडियन 2 देखील सामील आहे. 

Web Title: film chhatriwali spreading awareness about sex education among people says rakul preet singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.