मुख्यमंत्री खट्टर यांनी केली घोषणा, फिल्मसिटी बांधली जाणार हरयाणामध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 12:19 PM2021-01-16T12:19:07+5:302021-01-16T12:20:01+5:30
हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी नुकतीच घोषणा केली आहे की, हरयाणा राज्यात लवकरच फिल्म सिटी बांधली जाणार आहे.
मुंबईत गोरेगाव येथे असलेल्या दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये मोठ्या प्रमाणावर मालिकांचे आणि चित्रपटांचे चित्रीकरण केले जाते. त्याच धर्तीवर उत्तर प्रदेशमध्ये चित्रनगरी बांधण्याची घोषणा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली होती आणि आता हरयाणामध्ये फिल्मसिटी बांधली जाणार आहे.
हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी नुकतीच घोषणा केली आहे की, हरयाणा राज्यात लवकरच फिल्म सिटी बांधली जाणार असून त्यासाठी ५० ते १०० एकरची जमीन घेतली जाणार आहे. हरयाणामध्ये कलेला नेहमीच प्राधान्य दिले जाते.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, हरयाणामधील कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य स्तरावर नेहमीच पारितोषिक देऊन त्यांना गौरवण्यात येते. आता हरयाणामध्ये फिल्म सिटी लवकरच बांधली जाणार आहे. कलाकारांच्या काही प्रतिनिधींनी नुकतीच मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची भेट घेतली आणि हरयाणाच्या लोकनृत्याला अधिक प्रसिद्ध करण्यासाठी काय करू शकतो याविषयी चर्चा केली. हरयाणाच्या लोकनृत्याद्वारे लोकांमध्ये जागृती निर्माण कण्याचा त्यांनी सल्ला दिला.