Film Jai Bhim Controversy : 'जय भीम' चित्रपटावरून वाद; अभिनेता सूर्याला मिळाली धमकी, घराबाहेर पोलीस तैनात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 11:30 AM2021-11-17T11:30:49+5:302021-11-17T11:32:34+5:30

आठवडाभरात पाच कोटी रुपये भरपाई देण्याची मागणीही करण्यात आली आहे. असे असतानाच, चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेत लोक धमकी देत असल्याने सूर्याच्या घराबाहेर पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

Film jai bhim controversy actor Surya is getting threats five police personnel are deployed with arms outside his house  | Film Jai Bhim Controversy : 'जय भीम' चित्रपटावरून वाद; अभिनेता सूर्याला मिळाली धमकी, घराबाहेर पोलीस तैनात

Film Jai Bhim Controversy : 'जय भीम' चित्रपटावरून वाद; अभिनेता सूर्याला मिळाली धमकी, घराबाहेर पोलीस तैनात

googlenewsNext

गेल्या 2 नोव्हेंबरला Amazon Prime Video वर प्रदर्शित झालेला 'जय भीम' (Jai Bhim) चित्रपट सध्या जबरदस्त चर्चेत आहे. या चित्रपटातील दृश्यांवरून सुरू झालेला वाद संपन्याचे नाव नाही. नुकतेच वन्नियार संगमच्या प्रदेशाध्यक्षांनी अभिनेता सूर्या, ज्योतिका, अमॅझॉन प्राइम व्हिडिओ आणि चित्रपट 'जय भीम'चे दिग्दर्शक टीजे ग्नानवेल यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. यात, चित्रपटाच्या निर्मात्यांनी जनतेची माफी मागावी आणि मानहानिकारक म्हणण्यात आलेले सर्व दृश्य काढून टाकावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सूर्याला मिळतेय धमकी - 
याच बरोबर, आठवडाभरात पाच कोटी रुपये भरपाई देण्याची मागणीही करण्यात आली आहे. असे असतानाच, चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेत लोक धमकी देत असल्याने सूर्याच्या घराबाहेर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्याच्या टी नगर येथील घराबाहेर शस्त्रांसह पाच पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

या चित्रपटात, इरुलर समुदायाच्या लोकांना कोठडीत कशा प्रकारे यातना दिल्या जात होत्या, याचे चित्रण करण्यात आले आहे. यात हिंदी भाषीक लोक एका अशा दृश्यामुळे नाराज झाले आहेत, ज्यात प्रकाश राज यांना हिंदीमध्ये बोलण्यासाठी एक व्यक्तीला थापड मारताना दाखवले गेले आहे. 

पाठवण्यात आलेल्या नोटिसीत एका अशा दृष्याचे वर्णन करण्यात आले आहे, ज्यात अग्नि कुंड एका कॅलेंडरवर दिसत आहे. खरे तर, अग्नि कुंड हे वन्नियार समाजाचे प्रतिक आहे. निर्मत्यांनी हे कॅलेंडर जाणूनबुजून ठेवले होते. एवढेच नाही, तर राजकन्नूचा छळ करणाऱ्या पोलिसाचे चरित्र हेतुपुरस्सर वन्नियार जातीशी संबंधित जाखविण्यात आले आहे, असा दावाही या नोटिसीत करण्यात आला आहे. 


 

Web Title: Film jai bhim controversy actor Surya is getting threats five police personnel are deployed with arms outside his house 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.