Salman Khan Look Out: किसी का भाई, किसी की जान...! कधीच पाहिला नसेल सलमानचा असा स्वॅग, पाहा टीझर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 01:06 PM2022-09-05T13:06:17+5:302022-09-05T13:06:27+5:30

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Teaser : सलमानचा ‘किसी का भाई, किसी की जान’ हा चित्रपट यावर्षी डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. तूर्तास या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. 

film Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Salman Khan bhaijaan new look teaser release | Salman Khan Look Out: किसी का भाई, किसी की जान...! कधीच पाहिला नसेल सलमानचा असा स्वॅग, पाहा टीझर

Salman Khan Look Out: किसी का भाई, किसी की जान...! कधीच पाहिला नसेल सलमानचा असा स्वॅग, पाहा टीझर

googlenewsNext

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Teaser : सध्या सोशल मीडियावर भाईजानची हवा आहे. होय, फक्त 59 सेकंदांचा एक व्हिडीओ समोर आला आणि सोशल मीडियावर भाईजान सलमान खानची (Salman Khan ) चर्चा सुरू झाली. व्हिडीओ कसला? सलमानच्या आगामी सिनेमाचा.
सलमानचा ‘किसी का भाई, किसी की जान’ हा चित्रपट यावर्षी डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. तूर्तास या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. 

सलमान खानने  हा टीझर शेअर केला आणि उण्यापुऱ्या तासाभरात या टीझरला त्याला 5 हजारांवर रिट्विट्स, 16 हजार लाईक्स आणि दीड लाखांवर व्ह्यूज मिळाले. इन्स्टावरही या टीझरला 5 लाखांवर लोकांनी लाईक्स केले. मोकळे लांब केस, डोळ्यांवर गॉगल,नेहमीचा सिग्नेचर ब्रेसलेट अशा रूपातील लडाखच्या मैदानात सलमानची पहिलीच झलक पाहून फॅन्स क्रेझी झालेत. या टीझरमधील भाईजानचा स्वॅग आणि टशन पाहण्यासारखा आहे.

गेल्या 26 ऑगस्ट रोजी इंडस्ट्रीत 34 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सलमानने या चित्रपटातील त्याचा लूक शेअर केला होता आणि आता टीझर शेअर केला आहे. टीझरच्या सुरूवातीला सलमान बाईकवर बसून धमाकेदार एन्ट्री घेतो. यानंतर  ब्राऊन शर्ट, डेनिम जीन्समध्ये तो फुलऑन टशनमध्ये चालताना दिसतो. त्याचे लांबसडक विखुरलेले केस , त्याचा किलर लुक चाहत्यांना चांगलाच भावला आहे.

 या टीझरसोबतच सलमानने या चित्रपटातील शहनाज गिलची एन्ट्रीही कन्फर्म केली आहे. आत्तापर्यंत शहनाजच्या ऑफिशिअल डेब्यूची घोषणा झाली नव्हती. पण सलमानने टीझर शेअर करताना तिला टॅग केलं आहे.   या चित्रपटात सलमानसोबत पूजा हेगडे लीड भूमिकेत दिसणार आहे.  फरहाद सामजी हा सलमानचा सिनेमा दिग्दर्शित करतोय.  साऊथचा सुपरस्टार व्यंकटेशही या चित्रपटात आहे.  चित्रपटात अ‍ॅक्शन, कॉमेडी, ड्रामा, रोमान्स आणि इमोशन आहे.  

Web Title: film Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Salman Khan bhaijaan new look teaser release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.