80 च्या दशकात या अभिनेत्रीने दिले होते ब्लॉकबस्टर सिनेमे, लग्नानंतर अॅक्टिंग सोडून बनली होती सिंगर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 08:00 AM2019-07-14T08:00:00+5:302019-07-14T08:00:02+5:30
1980 मध्ये प्रदर्शित झालेला ‘लव्ह स्टोरी’ हा चित्रपट पाहिला असेल तर या अभिनेत्रीचा चेहरा लगेच तुमच्या डोळ्यांपुढे येईल.
80 च्या दशकात गाजलेले बॉलिवूडचे अनेक चेहरे आज बॉलिवूडमधून गायब झालेत. असाच एक चेहरा म्हणजे, बॉलिवूड अभिनेत्री विजेयता पंडित हिचा. विजेयता दीर्घकाळापासून बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर आहे.
1980 मध्ये प्रदर्शित झालेला ‘लव्ह स्टोरी’ हा चित्रपट पाहिला असेल तर विजेयताचा चेहरा लगेच तुमच्या डोळ्यांपुढे येईल. या चित्रपटात विजेयताने पिंकी नामक व्यक्तिरेखा साकारली होती. कुमार गौरव यात तिचा हिरो होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीची गाजला होता.
विजेयता व कुमार गौरवची जोडी चांगलीच लोकप्रिय झाली होती. पुढे ही जोडी ऑन स्क्रिन नाही तर ऑफ स्क्रिनही जमली. कुमार गौरव व विजेयताच्या अफेअरच्या बातम्या त्या काळात चांगल्याच गाजल्या होत्या. कुमारसोबत वेळ घालवता यावा म्हणून विजेयताने अनेक चित्रपटांच्या ऑफर्सही धुडकावून लावल्या होत्या. पण विजेयता व कुमार गौरवचे नाते फार काळ टिकले नाही.
कुटुंबामुळे दोघांनीही या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यापश्चात विजेयता पुन्हा चित्रपटांकडे वळली. तिने ‘मोहब्बत’ नावाचा चित्रपट केला. 1985 मध्ये आलेला हा चित्रपटही सुपरडुपर हिट राहिला. विजेयताचे करिअर यामुळे सुरु झाले असे वाटत असतानाच तिने 1986 मध्ये दिग्दर्शक समीर मलकानसोबत लग्न केले. (समीर मलकानने ‘कार थीफ’ नावाचा चित्रपट बनवला होता. जो दणकून आपटला होता.)
‘मोहब्बत’नंतर विजेयताने आणखी काही चित्रपट केलेत आणि अचानक अॅक्टिंग सोडून ती सींगिगकडे वळली. पण याचदरम्यान विजेयता आणि समीर यांचे लग्न तुटले. दोघांचाही घटस्फोट झाला. यानंतर विजेयताच्या आयुष्यात सिंगर आदेश श्रीवास्तवची एन्ट्री झाली. 1990 मध्ये दोघांनीही लग्न केले. आदेशने विजेयताचा एक पॉप अल्बमही काढला. या अल्बमचे नाव होते, ‘प्यार का इजहार’.
2005 मध्ये आदेश श्रीवास्तवचे निधन झाले. आदेशच्या निधनानंतर विजेयताचे आयुष्य विस्कटले. सध्या विजेयताला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय. विजेयता व आदेश यांना अवितेश आणि अनिवेश नावाची दोन मुले आहेत.
मध्ये एका मुलाखतीत विजेयता म्हणाली होती की, हा कठीण काळ आहे. आदेश माझ्यासाठी जे काही सोडून गेला, मी त्यातच गुजराण करतेय. आम्ही आमची कारही विकली. आदेशची एक म्युझिक रूम भाड्याने दिली. पण मला कुणाकडून मदत घ्यायची नाही.