प्रसिद्ध फिल्म प्रोड्यूसरला कारमध्ये परस्त्रीसोबत रंगेहाथ पकडले; पत्नीला कारखाली चिरडण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 07:47 AM2022-10-27T07:47:20+5:302022-10-27T07:47:50+5:30

मिश्राची पत्नी जेव्हा त्याच्या घरी गेली तेव्हा तो त्याच्या कारमध्ये दुसऱ्या महिलेसोबत बसल्याचे तिने पाहिले. तिच्यासोबत रोमॅन्टिक झाला होता.

Film producer kamal kishore mishra caught red-handed with woman in car; after he crushed Wife under car allegations | प्रसिद्ध फिल्म प्रोड्यूसरला कारमध्ये परस्त्रीसोबत रंगेहाथ पकडले; पत्नीला कारखाली चिरडण्याचा प्रयत्न

प्रसिद्ध फिल्म प्रोड्यूसरला कारमध्ये परस्त्रीसोबत रंगेहाथ पकडले; पत्नीला कारखाली चिरडण्याचा प्रयत्न

googlenewsNext

फिल्म प्रोड्यूसर कमल किशोर मिश्रा अडचणीत सापडला आहे. त्याच्याविरोधात मुंबईच्या आंबोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परस्त्रीसोबत रंगेहाथ पकडल्याचे पाहून त्याने त्याच्या पत्नीवरच कार चढविली आहे. यामध्ये त्याची पत्नी गंभीर जखमी झाली असून तिने पोलिसांकडे पतीने आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. 

मिश्रा याने पत्नीला कारने टक्कर मारली आणि ती खाली पडल्यावर तिच्यावरून कार घेऊन गेला. पत्नीच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आंबोली पोलिसांनी कमल मिश्रा याच्याविरोधात आयपीसी 279 आणि 338 नुसार गुन्हा नोंद केला आहे. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. 

१९ ऑक्टोबरची ही घटना आहे. मिश्राची पत्नी जेव्हा त्याच्या घरी गेली तेव्हा तो त्याच्या कारमध्ये दुसऱ्या महिलेसोबत बसल्याचे तिने पाहिले. तिच्यासोबत रोमॅन्टिक झाला होता. दोघांना सोबत पाहून मी कारच्या काचेवर टकटक केले आणि काच खाली करण्यात सांगितले. परंतू, कमलकिशोरने कार घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. मी त्याची कार थांबविण्यासाठी पुढे आले तर त्याने कार माझ्यावरून घातली. यामुळे माझ्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, असे मिश्राच्या पत्नीने पोलिसांना सांगितले. 

या प्रकरणी आणि पत्नीच्या आरोपांवर कमल किशोर मिश्रा याचे अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. भूतियापा, फ्लॅट नंबर 420, शर्मा जी की लग गई, देहाती डिस्को, खली बली यांसारख्या अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. 2019 मध्ये त्याने निर्माता म्हणून पदार्पण केले.

Web Title: Film producer kamal kishore mishra caught red-handed with woman in car; after he crushed Wife under car allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.