विक्रम भट यांनी सांगितलं हॉरर चित्रपट बनवण्यामागचं कारण, म्हणाले "मलाही भुतांचा अनुभव आला"
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 09:56 IST2025-03-18T09:54:14+5:302025-03-18T09:56:39+5:30
हॉरर चित्रपटांसाठी विक्रम भट हे चाहत्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत.

विक्रम भट यांनी सांगितलं हॉरर चित्रपट बनवण्यामागचं कारण, म्हणाले "मलाही भुतांचा अनुभव आला"
Vikram Bhatt Talk About His Horror Films: बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक विक्रम भट गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत आहेत. बॉलिवूडमध्ये त्यांचा दबदबा आहे. हॉरर चित्रपटांसाठी विक्रम भट हे चाहत्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. 'जिस्म', 'राझ', 'Hate Story', 'Creature' असे अनेक चित्रपट त्यांनी दिले आहेत. बोल्ड सीन्स ही त्यांच्या सिनेमांची खासियतच आहे. आता पुन्हा एकदा विक्रम भट (Vikram Bhat) यांचं नाव चर्चेत आलं आहे.
अलिकडेच विक्रम भट्ट 'तुमको मेरी कसम' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कॉमेडियन भारती सिंगच्या पॉडकास्टवर आले. यावेळी त्यांनी हॉरर जॉनर चित्रपट बनवण्यामागील खरा उद्देश सांगितला. ते म्हणाले, "देव अस्तित्वात आहे हे सिद्ध करण्यासाठी मी चित्रपटांमध्ये भूत दाखवतो. माझे हॉरर चित्रपट कधीच भूतांबद्दल नव्हते, ते देवाचे अस्तित्व सिद्ध करण्याबद्दल होते. जर आपण गीतेवर विश्वास ठेवतो, आत्म्यावर विश्वास ठेवतो, तर आपल्याला हे माहित असले पाहिजे की आत्मा चांगला किंवा वाईट देखील असू शकतो".
ते म्हणाले, "भूत हे आपण चित्रपटांमध्ये दाखवतो तसे नसतात. तो अगदी सामान्यासारखे दिसतात. एखादी व्यक्ती पाहिल्यानंतर तुम्हाला असे वाटते की हिच्यात काहीतरी वेगळं आहे. तुम्ही त्या व्यक्तीपासून स्वत:ला लगेच दूर करता. मलाही भुतांचा अनुभव आला". यावेळी विक्रम भट यांनी त्याच्या आगामी सिनेमाबद्दल अपडेट दिलं. दोन हॉरर चित्रपट बनवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
विक्रम भट्ट 'तुमको मेरी कसम' हा चित्रपट येत्या २१ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. खूप वर्षानंतर विक्रम भट यांनी एक थ्रिलर ड्रामा चित्रपट बनवला आहे. 'गुलाम' चित्रपटानंतर त्यांनी आता हा ड्रामा चित्रपट बनवला आहे. 'तुमको मेरी कसम' यामध्ये अभिनेत्री अदा शर्मा, ईशा देओल, अनुपम खेर आणि इश्वाक सिंग यांच्या भुमिका आहेत.