Filmfare Awards 2023 : आलिया भट, राजकुमार राव सर्वोत्कृष्ट कलाकार; वाचा फिल्मफेअर अवॉर्डची संपूर्ण लिस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 09:25 AM2023-04-28T09:25:09+5:302023-04-28T09:26:12+5:30
यंदाच्या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये गंगूबाई काठियावाडीचा दबदबा
हिंदी सिनेसृष्टीतील प्रतिष्ठित पुरस्कार फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 (Filmfare Awards 2023) काल थाटात पार पडला. कलाकारांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. आलिया भट, जान्हवी कपूर, नोरा फतेही, विकी कौशल आणि अनेक कलाकारांनी फिल्मफेअर सोहळ्याची शोभा वाढवली. रेड कार्पेटवर सर्वच सिताऱ्यांचा जलवा होता. तसंच सलमान खानने शो होस्ट करत धम्माल आणली तर आयुष्मान खुराना आणि मनीष पॉल यांनी साथ दिली.
राजकुमार राव आणि आलिया भटला मिळाला फिल्मफेअर
अभिनेता राजकुमार रावला (Rajkumar Rao) सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. 'बधाई दो' या सिनेमासाठी त्याने हा पुरस्कार पटकावला. तर 'गंगूबाई काठियावाडी' मधील उत्कृष्ट अभिनयासाठी आलिया भटने (Alia Bhat) फिल्मफेअर आपल्या नावावर केला. सर्वोत्कृष्ट फिल्म 'गंगुबाई काठियावाडी' आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी ठरले.
Congratulations!
— Filmfare (@filmfare) April 27, 2023
The Filmfare Award for Best Actor in a Leading Role (Male) goes to #RajkummarRao for #BadhaaiDo at the 68th #HyundaiFilmfareAwards 2023 with #MaharashtraTourism. pic.twitter.com/Q1e0VNWzZF
Congratulations!
— Filmfare (@filmfare) April 27, 2023
The Filmfare Award for Best Film goes to #GangubaiKathiawadi at the 68th #HyundaiFilmfareAwards 2023 with #MaharashtraTourism. pic.twitter.com/bpJKuXrCm5
इतर विजेत्यांची लिस्ट खालीलप्रमाणे
सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रिटिक्स ) - बधाई दो
सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स) - संजय मिश्रा (वध)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री(क्रिटिक्स) - भूमि पेडणेकर (बधाई दो) आणि तब्बू (भूलभूलैय्या २)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - अनिल कपूर (जुग जुग जिओ)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - शिबा चड्डा (बधाई दो)
सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बम - प्रितम (ब्रम्हास्त्र)
सर्वोत्कृष्ट गायक - अर्जित सिंह (केसरिया)
सर्वोत्कृष्ट गायिका - कविता सेठ (रंगीसारी)
याशिवाय अभिनेते प्रेम चोप्रा यांना लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देण्यात आला. बीकेसीच्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये हा फिल्मफेअर अवॉर्ड पार पडला.