Goldie Behl: ‘फ्लॉप शो’नं बॉलिवूड बेजार, पण ‘बायकॉट ट्रेंड’ हे कारण नाही..., वाचा काय म्हणाला गोल्डी बहल?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 10:13 AM2022-09-06T10:13:04+5:302022-09-06T10:14:04+5:30

बॉलिवूडच्या फ्लॉप शोमागे बायकॉट ट्रेंड असल्याचं अनेकांचं मत आहे. पण बॉलिवूडचा दिग्गज निर्माता व अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा पती गोल्डी बहलचं (Goldie Behl) मत वेगळंच आहे.

Filmmaker Goldie Behl Talks on Boycott Trend In Bollywood | Goldie Behl: ‘फ्लॉप शो’नं बॉलिवूड बेजार, पण ‘बायकॉट ट्रेंड’ हे कारण नाही..., वाचा काय म्हणाला गोल्डी बहल?

Goldie Behl: ‘फ्लॉप शो’नं बॉलिवूड बेजार, पण ‘बायकॉट ट्रेंड’ हे कारण नाही..., वाचा काय म्हणाला गोल्डी बहल?

googlenewsNext

 Goldie Behl Talks on Boycott Trend In Bollywood : 2022 या वर्षानं बॉलिवूडला बेजार केलं. या वर्षात आलेले बहुतांश सिनेमे बॉक्स ऑफिसवर दणकून आपटले. त्यात बायकॉटच्या ट्रेंडने बॉलिवूडच्या चिंतेत भर घातली. आमिरचा ‘लालसिंग चड्ढा’, अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’, साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडाचा ‘लाइगर’ सगळ्याच सिनेमांचा फ्लॉप शो झाला. या फ्लॉप शोमागे बायकॉट ट्रेंड असल्याचं अनेकांचं मत आहे. पण बॉलिवूडचा दिग्गज निर्माता व अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा पती गोल्डी बहलचं (Goldie Behl) मत वेगळंच आहे. एका ताज्या मुलाखतीत तो यावर बोलला.
स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत त्याने यावर भाष्य केलं. ‘लाइगर’ फ्लॉप होण्यामागे बायकॉट ट्रेंड कारणीभूत आहे का? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. यावर, त्याने नकारार्थी उत्तर दिलं.

काय म्हणाला गोल्डी बहल?
बायॅकॉट ट्रेंडमुळे सिनेमे फ्लॉप होत आहेत, असं मला मुळीच वाटत नाही. तुम्ही थिएटरमध्ये जाणाºया लोकांचा आणि सोशल मीडियावर बायकॉट करणाºया लोकांचा आकडा पाहाल तर तुम्ही स्वत:च खरं काय ते समजाल. कोणताही ट्रेंड चित्रपटाला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही, माझा यावर पक्का विश्वास आहे. मी या इंडस्ट्रीत दीर्घकाळापासून आहे. सिनेमा लोकांच्या काळजाला भिडायला हवा. सिनेमा प्रेक्षकांना अपील व्हायला हवा, असं असेल तर कोणीच सिनेमा हिट होण्यापासून रोखू शकत नाही. अर्थात सध्या लोक प्रचंड नकारात्मकता पसरवत आहेत आणि हे दुर्दैवी आहे. या नकारात्मकतेमुळे सिनेमे फ्लॉप होत आहेत की हा निव्वळ योगायोग आहे, हे मला ठाऊक नाही. पण चांगला सिनेमा हिट होतोच, एवढं मात्र मी नक्की सांगू शकतो, असं गोल्डी बहल म्हणाला.

‘लाइगर’ हा सिनेमा 25 ऑगस्टला रिलीज झाला होता. या चित्रपटाने आठवडाभरात केवळ 39 कोटींची कमाई केली. पुरी जगन्नाथने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात विजय देवरकोडा व अनन्या पांडे लीड रोलमध्ये होते.

Web Title: Filmmaker Goldie Behl Talks on Boycott Trend In Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.