दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांच्या वडिलांचे निधन, बॉलिवूडकरांनी व्यक्त केले दु:ख
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 03:43 PM2020-04-02T15:43:58+5:302020-04-02T15:44:58+5:30
दु:खद!!
दिग्गज लेखक व दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांचे वडील देवेन्द्रनाथ मिश्रा यांचे आज सकाळी निधन झाले. सुधीर मिश्रा यांनी स्वत: ट्विट करत याची माहिती दिली. यानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सांत्वना व्यक्त केल्या.
‘माझे वडील डॉ़ देवेन्द्रनाथ मिश्रा यांचे आज सकाळी निधन झाले. लखनौचा एक मुलगा. एक गणितज्ज्ञ आणि मग गणिताचा प्राध्यापक...सागर युनिव्हर्सिटी, ज्वाइंट एज्युकेशन अॅडव्हायजरख मिनिस्ट्री आॅफ एज्युकेशन, डेप्युटी डायरेक्टर सीएसआयआर, एमपी सासन्स अॅण्ड टेक्नॉलॉजीचे हेड आणि बीएचयूचे व्हाईस चान्सलर.’ असे सुधीर मिश्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले.
My Dad Dr DevendraNath Misra passed away this morning ,A Lucknow boy ,wasmany things . A Mathematician nwent 2become a Professor of Mathematics ,Sagar University, Jt. Education Advisor, Mini of Education,Dep. Director CSIR, Head of MP Science n Technology n Vice. Chancellor BHU
— Sudhir Mishra (@IAmSudhirMishra) April 2, 2020
सुधीर मिश्रा यांच्या वडिलांच्या निधनाची बातमी कळताच बॉलिवूडच्या अनेकांनी शोकसंदेश लिहित सुधीर मिश्रा यांचे सांत्वन केले.
My condolences sir. May his soul rest in peace 🙏 https://t.co/e25Z6pnfuy
— sonu sood (@SonuSood) April 2, 2020
Terrible news regarding the passing away of a gentleman, visionary thinker and teacher. Most don’t realise the contribution of Sudhir’s parents to the film industry of today. They opened their house and hearts for all dreamers that walked into it. #RIPDNMishra@IAmSudhirMishra 🙏
— Nikkhil Advani (@nikkhiladvani) April 2, 2020
सुधीर मिश्रा बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक व लेखक आहेत. 1983 मध्ये प्रदर्शित जाने भी दो यारों या चित्रपटाच्या पटकथा लेखनापासून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. 1987 मध्ये त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले. ये वो मंजिल तो नहीं हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा. यानंतर मैं जिंदा हूं, धारावी, इस रात की सुबह नहीं,चमेली, हजारो ख्वाहिशें ऐसी असे अनेक चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केलेत.
अलीकडे व्हायरल झाला होता व्हिडीओ
अलीकडे कोरोना लॉकडाऊनच्या काळात एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत एका व्यक्तिला पोलिस फटके देताना दिसले होते. व्हिडीओतील ही व्यक्ति सुधीर मिश्रा आहे, असा दावा केला गेला होता. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. अर्थात व्हिडीओतील व्यक्ती आपण नसल्याचे सुधीर मिश्रा यांनी लगेच स्पष्ट केले होते.