या महिन्यात सुरू होणार सलमान खानच्या दबंग ३ या चित्रपटाचे चित्रीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 12:09 PM2018-10-27T12:09:51+5:302018-10-28T06:30:00+5:30

दबंग २ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधीच सलमानने दबंग ३ विषयी मीडियाला कल्पना दिला होती. या चित्रपटाची चर्चा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असली तरी या चित्रपटाचे चित्रीकरण अद्याप तरी सुरू झालेले नाही.

Filmmaking of Salman Khan's Dabang 3 film will be released this month | या महिन्यात सुरू होणार सलमान खानच्या दबंग ३ या चित्रपटाचे चित्रीकरण

या महिन्यात सुरू होणार सलमान खानच्या दबंग ३ या चित्रपटाचे चित्रीकरण

googlenewsNext

दबंग या चित्रपटात सलमान खानने साकारलेली चुलबुल पांडे ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. या चित्रपटातील सलमानचे सगळेच संवाद गाजले होते. त्याचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड भावला होता. या चित्रपटातील सगळी गाणी देखील हिट झाली होती. या चित्रपटाद्वारे सोनाक्षी सिन्हाने तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली होती. या चित्रपटाच्या यशानंतर दबंग २ हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या चित्रपटातदेखील सलमान आणि सोनाक्षीचीच जोडी जमली होती. या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. या चित्रपटाच्या यशानंतर आता प्रेक्षकांना दबंग ३ पाहायला मिळणार आहे. 

दबंग २ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधीच सलमानने दबंग ३ विषयी मीडियाला कल्पना दिला होती. या चित्रपटाची चर्चा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असली तरी या चित्रपटाचे चित्रीकरण अद्याप तरी सुरू झालेले नाही. सध्या सलमान खान अली अब्बास जाफरच्या भारत या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटासोबतच तो दबंग ३ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार असल्याचे म्हटले जात होते. पण अद्याप तरी सलमानने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केलेली नाही. सलमान आणि सोनाक्षीच्या दबंग ३ चे चित्रीकरण या वर्षाच्या अखेरीस सुरू होईल असे स्वतः सोनाक्षीने एका मुलाखतीत सांगितले होते. पण आता या वर्षाच्या अखेरीस नव्हे तर २०१९ मध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. 

दबंग २ चा दिग्दर्शक आणि सलमान खानचा भाऊ अरबाज खान याने नुकत्याच एका मुलाखतीत याबाबतीत सांगितले आहे. त्याने सांगितले आहे की, दबंग ३ या चित्रपटाचे चित्रीकरण फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू होणार आहे. या चित्रपटाचे बहुतांश काम झाले असून या चित्रपटाची पटकथा देखील ठरवण्यात आलेली आहे. चित्रपटासाठी कलाकार आणि तंत्रज्ञ यांची देखील निवड करण्यात आलेली आहे. सध्या आम्ही गाण्यांवर काम करत असून त्यानंतर चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लोकेशन्स शोधणार आहोत. फेब्रुवारीच्या सुरुवातीला अथवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार असून हा चित्रपट २०१९ च्या अखेरीस प्रदर्शित करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. 

Web Title: Filmmaking of Salman Khan's Dabang 3 film will be released this month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.