'लाल सिंह चड्ढा'चे शेवटच्या शेड्युलचे शूटिंग होणार कारगिलमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 09:54 IST2021-02-20T09:53:37+5:302021-02-20T09:54:14+5:30
आमिर खानचा ख्रिसमसला रिलीज होणारा चित्रपट 'लाल सिंह चड्ढा'चे शूटिंग अद्याप बाकी आहे.

'लाल सिंह चड्ढा'चे शेवटच्या शेड्युलचे शूटिंग होणार कारगिलमध्ये
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा ख्रिसमसला रिलीज होणारा चित्रपट 'लाल सिंह चड्ढा'चे शूटिंग अद्याप बाकी आहे. या चित्रपटात आमिर खान अशा जवानाच्या भूमिकेत दिसणार आहे जो रिटायरमेंटनंतर बस स्टॅण्डवर बसून आपली स्टोरी तिथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ऐकवतो. आमिर खान ही भूमिका साकारताना चित्रपटात तरूणपणापासून वयस्कर पर्यंतचा प्रवास रेखाटणार आहे आणि यादरम्यान देशातील राजकीय घडामोडी त्याच्या दृष्टीकोनातून सादर करणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लाल सिंग चड्ढाचे शेवटचे शेड्युल यावर्षी उन्हाळ्यात कारगिलमध्ये शूट होणार आहे. हे दृश्य चित्रपटात खूप महत्त्वाचे आहेत कारण मूळ चित्रपट फॉरेस्ट गंपमधील गंपची भूमिका एका जवानाची होती. आमिर खानने या चित्रपटासाठी स्वतःमध्ये शारीरिक रुपांतरण केला आहे आणि त्यासाठी फिटनेस आणि लूक्सवर स्वतः काम केले आहे.
सहा ऑस्कर पुरस्कार जिंकणारा चित्रपट फॉरेस्ट गम्पचा हिंदी रिमेक 'लाल सिंह चड्ढा'साठी आमिर खान खूप मेहनत घेतो आहे. आपले लक्ष विचलित होऊ नये यासाठी तो फार कमी लोकांना भेटतो आहे. त्याचा मोबाइलदेखील सध्या बंद असतो. आमिर खानसाठी 'लाल सिंह चड्ढा' सिनेमा त्याच्या करिअरमधील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे.
त्याचा शेवटचा सिनेमा ठग्स ऑफ हिंदुस्थान चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. दरम्यान आमिर खानचा मुलगा जुनैददेखील चित्रपटात पाऊल टाकले आहे. ठग्स ऑफ हिंदुस्तान चित्रपट बनवणारी यशराज फिल्म्सने जुनैदला पहिला ब्रेक दिला आहे. त्याने महाराजासाठी शूटिंग सुरू केले आहे. आमिर खानची लेक इरा खानलादेखील अभिनयात रस आहे आणि ती रंगभूमीवर सक्रीय आहे.