अखेर फेमिना मॅगझिनने मागितली प्रियंका चोपडाची जाहीर माफी, वाचा नेमके काय आहे प्रकरण!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2017 02:56 PM2017-12-02T14:56:16+5:302017-12-02T20:26:16+5:30

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडा हिची फेमिना मॅगझिनने जाहीर माफी मागितली आहे. काही दिवसांपूर्वी फेमिना मॅगझिनमध्ये प्रियंका चोपडाची मुलाखत ...

Finally, Femina Magazine asked Priyanka Chopra to apologize; | अखेर फेमिना मॅगझिनने मागितली प्रियंका चोपडाची जाहीर माफी, वाचा नेमके काय आहे प्रकरण!

अखेर फेमिना मॅगझिनने मागितली प्रियंका चोपडाची जाहीर माफी, वाचा नेमके काय आहे प्रकरण!

googlenewsNext
लिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडा हिची फेमिना मॅगझिनने जाहीर माफी मागितली आहे. काही दिवसांपूर्वी फेमिना मॅगझिनमध्ये प्रियंका चोपडाची मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र या मुलाखतीतील एका कोटमुळे चांगलेच वादंग निर्माण झाले होते. त्याचे झाले असे की, प्रियंकाने काही दिवसांपूर्वी फेमिनाला एक मुलाखत दिली होती. ज्याचा मथळा ‘I’m all about girl love’ असा होता. या मुलाखतीत प्रियंकाचा एक कोट प्रसिद्ध करण्यात आला होता. या कोटमध्ये तिने कोणाचेही नाव न घेता मी त्याला ‘एमएफ’ असे बोलावित असल्याचे तिने म्हटले होते. 

प्रियंकाची ही मुलाखत ९ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाली होती. मुलाखतीदरम्यान प्रियंकाला तिच्या जॅकेटवरून एक प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र मॅगझिनने या जॅकेटचा संबंध तिच्या एक्स बॉयफ्रेंडशी जोडला होता. शिवाय त्याच अनुषंगाने तिचा कोट प्रसिद्ध केला होता. रिपोर्ट्सनुसार, जेव्हा ही मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली तेव्हा पीसी खूपच अपसेट होती. जेव्हा ही बाब मॅगझिनला समजली तेव्हा त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. तसेच प्रियंका आणि तिच्या चाहत्यांची माफी मागताना एक स्टेटमेंटही प्रसिद्ध केले. 



काही महिन्यांपूर्वीच प्रियंका यूएसच्या ‘डर्टी लॉन्ड्री’ या चॅट शोमध्ये सहभागी झाली होती. यावेळी पीसीने शोच्या होस्टबरोबर चर्चा करताना त्या रहस्यमय जॅकेटविषयी खुलासा केला होता. पीसीने म्हटले होते की, हे माझे फेव्हरेट जॅकेट असून, आता ते एअरपोर्ट अ‍ॅक्सेसरीज बनले आहे. हे जॅकेट कोणी दिले याविषयी जेव्हा विचारण्यात आले तेव्हा पीसीने म्हटले की, ‘एकदा तो माझ्या घरी आला असता जॅकेट विसरला होता. त्यानंतर त्याने ते परतही मागितले होते. मात्र मी त्याला परत केले नाही. तेव्हापासून हे जॅकेट माझे फेव्हरेट बनले आहे. 

पीसीचे हे फेव्हरेट जॅकेट शाहरूख खानचे असावे, असा अंदाज वर्तविला जात आहे. कारण एकदा शाहरूख हेच जॅकेट परिधान करून स्पॉट झाला होता. जेव्हा पीसी आणि त्याच्यातील अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या, तेव्हाच हे जॅकेट शाहरूखने पीसीला दिले असावे, असे म्हटले जाते. 

Web Title: Finally, Femina Magazine asked Priyanka Chopra to apologize;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.