...अखेर ‘सरकार-३’ची रिलिज डेट निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2017 02:49 PM2017-02-08T14:49:58+5:302017-02-08T20:55:58+5:30
राम गोपाल वर्मा यांच्या ‘सरकार’ सिरीजच्या ‘सरकार-३’ च्या रिलिजची डेट अखेर निश्चित करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच स्टारकास्टबाबतचा खुलासा करण्यात आला होता. मात्र रिलिजबाबत सस्पेंस कायम ठेवण्यात आल्याने प्रेक्षकांना या सिनेमाच्या रिलिज डेटबाबत कमालीची उत्सुकता लागली होती. मात्र आता रिलिज डेट निश्चित झाल्याने प्रेक्षकांची आतुरता काहीसी संपली असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
र म गोपाल वर्मा यांच्या ‘सरकार’ सिरीजच्या ‘सरकार-३’ च्या रिलिजची डेट अखेर निश्चित करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच स्टारकास्टबाबतचा खुलासा करण्यात आला होता. मात्र रिलिजबाबत सस्पेंस कायम ठेवण्यात आल्याने प्रेक्षकांना या सिनेमाच्या रिलिज डेटबाबत कमालीची उत्सुकता लागली होती. मात्र आता रिलिज डेट निश्चित झाल्याने प्रेक्षकांची आतुरता काहीसी संपली असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘सरकार’ या बहुचर्चित सिरिजच्या ‘सरकार राज’नंतर ‘सरकार-३’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महानायक अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाच्या स्टार कास्टपासूनच सस्पेंस ठेवण्यात आला होता. अगदी टप्प्याटप्प्याने सिनेमाच्या अनुषंगाने खुलासे केले गेल्याने या सिनेमाबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. रिलिज डेटबाबतही असाच सस्पेंस ठेवण्यात आल्याने प्रेक्षकांना या सिनेमाविषयी आतुरता लागली होती. अखेर रिलिज डेट निश्चित झाली असून, हा सिनेमा ७ एप्रिल २०१७ रोजी सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दरम्यान सिनेमाच्या पहिल्या भागापासूनच सुभाष नागरेच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिनेत्री यामी गौतम बघावयास मिळणार आहे. सिनेमात यामी अन्नू करकरेच्या भूमिकेत असून, जी तिच्या वडिलांच्या हत्त्येचा सरकारकडून बदला घेण्यासाठी धडपड करीत असते. यामी व्यतिरिक्त रोनित राय गोकुळ साटमच्या भूमिकेत दिसणार आहे. जो सरकारचा अतिशय विश्वास पात्र असतो. तर ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी निगेटिव्ह भूमिकेत बघावयास मिळणार आहे.
अभिनेता मनोज वाजपेयी याचीही सिनेमात प्रमुख भूमिका असून, दुसºयांदा तो राम गोपाल वर्मा यांच्याबरोबर काम करीत आहे. तसेच जॅकी श्रॉफ हा मुख्य खलनायकाची भूमिका साकारत असून, पहिल्यांदाच त्याच हटके लूक बघावयास मिळणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलिज करण्यात आला होता. ट्रेलर बघून केआरके अर्थात कमाल खान याने बिग बीचे तोंडभरून कौतुकही केले होते. त्याचबरोबर हा सिनेमा सुपरहिट ठरेल, असे भाकीतही केले होते. आता सिनेमा प्रेक्षकांच्या कितपत पसंतीस उतरणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच.