​अखेर जॉन अब्राहमच्या ‘परमाणु’ला मिळाले मुहूर्त!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2018 10:25 AM2018-02-04T10:25:45+5:302018-02-04T15:55:45+5:30

जॉन अब्राहम गेल्या काही दिवसांपासून नाराज होता. आता कदाचित त्याची नाराजी दूर झाली असावी. होय, याचे कारण म्हणजे, जॉनच्या ...

Finally John Abraham got 'Atomu' emotions !! | ​अखेर जॉन अब्राहमच्या ‘परमाणु’ला मिळाले मुहूर्त!!

​अखेर जॉन अब्राहमच्या ‘परमाणु’ला मिळाले मुहूर्त!!

googlenewsNext
न अब्राहम गेल्या काही दिवसांपासून नाराज होता. आता कदाचित त्याची नाराजी दूर झाली असावी. होय, याचे कारण म्हणजे, जॉनच्या ‘परमाणु : द स्टोरी आॅफ पोखरण’ या चित्रपटाला अखेर मुहूर्त मिळालेय. होय,दुस-या चित्रपटांसोबतचा बॉक्सआॅफिसवरचा संघर्ष टाळण्यासाठी गेल्या कित्येक  महिन्यांपासून या चित्रपटाला लांबणीवर टाकले जात होते.    साहजिकचं जॉन यामुळे संतापला होता. या संतापामागचे कारणही समजण्यासारखे होते. जॉन अब्राहम दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. चित्रपटगृहात जॉनचा चित्रपट येऊन बराच काळ लोटलाय.  अशास्थितीत जॉनला लगेच अ‍ॅक्टिव्ह होणे गरजेचे आहे. असे असताना बनून तयार असलेला चित्रपट वारंवार रखडतो म्हटल्यावर जॉनची चिडचिड होणे साहजिक होते. नेमके तेच झाले होते.
सर्वप्रथम हा चित्रपट ८ डिसेंबर २०१७ रोजी ‘परमाणु’ रिलीज होणार होता. पण तेव्हा संजय लीला भन्साळींचा ‘पद्मावत’ची रिलीज डेट जवळ असल्याच्या कारणावरून ‘परमाणु’ला लांबणीवर टाकले गेले. अर्थात ‘पद्मावत’ काही रिलीज झाला नाही आणि त्याच्या वादात ‘परमाणु’चा मात्र खोळंबा झाला. यानंतर या चित्रपटासाठी २३ फेबु्रवारी ही तारीख निश्चित करण्यात आली.   पण राणी मुखर्जीचा ‘हिचकी’ आणि सोनाक्षी सिन्हाचा ‘बूम बूम इन न्यूयॉर्क’ पुन्हा या चित्रपटाच्या मार्गात आला. यामुळे ‘परमाणू’ची रिलीज डेट लांबणीवर टाकण्यात आली.  या वारंवार लांबणीवर पडणाºया रिलीज डेटमुळेचं जॉन बिथरला होता. पण आता जॉनच्या या चित्रपटाला रिलीज डेट मिळाली आहे. सरतेशेवटी येत्या ९ एप्रिलला  हा चित्रपट रिलीज होतो आहे. आता या मार्गात आणखी एखादा चित्रपट येऊ नये, इतकीच आशा करूयात.

ALSO READ : ​नाराज आहे जॉन अब्राहम! ‘परमाणु’ आहे कारण!!

  १३ मे १९९८ रोजी पोखरण येथे झालेल्या आण्विक चाचण्यांच्या स्मृती ताज्या करणाºया या चित्रपटात जॉन अब्राहम, डायना पेन्टी आणि बोमन इराणी अशी स्टारकास्ट आहे. अभिषेक शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे, सैविन कदरोस आणि संयुक्ता चावला शेख यांनी. या दोघांनी याआधी ‘नीरजा’ची पटकथा लिहिली होती.

Web Title: Finally John Abraham got 'Atomu' emotions !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.