अखेर सारा अली खान आणि सुशांत सिंग राजपूतच्या 'केदारनाथ'च्या रिलीज डेटला मुहूर्त सापडला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2018 06:31 AM2018-05-10T06:31:22+5:302018-05-10T12:03:27+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून गुलदस्तात असलेली केदरानाथची रिलीज डेट अखेर जाहिर झाली आहे. सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खानचा ...
ग ल्या अनेक दिवसांपासून गुलदस्तात असलेली केदरानाथची रिलीज डेट अखेर जाहिर झाली आहे. सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खानचा हा चित्रपट ३० नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्शने हि माहिती ट्विटरवरुन दिली आहे. सोबत चित्रपटाचे पोस्टरसुद्धा शेअर केले आहे.
आधी हा चित्रपट शाहरुख खानच्या झिरोसोबत डिसेंबरमध्ये रिलीज होणार होता. मात्र यावरुन चित्रपटाची निर्माती प्रेरणा अरोरा आणि दिग्दर्शक अभिषेक कपूर यांच्यामध्ये वाद झाल्याची चर्चा आहे. प्रेरणाला बॉक्स ऑफिसवरील दोनही चित्रपटांमधील क्लैशस टाळायचे होते तर अभिषेक कपूर झिरोसोबतच केदरानाथ रिलीज करायचा होता. चित्रपटाचे पहिले शेड्यूल उत्तराखंडमध्ये पूर्ण करण्यात आले आहे. त्यानंतर काहीकाळ शूटिंग थांबवण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा उरलेले शूटिंग मुंबईत पूर्ण करण्यात येणार आहे. केदारनाथ रखडल्याने साराने करण जोहर आणि रोहित शेट्टीचा सिम्बा साईन केला. मध्यंतरी अशी चर्चादेखील रंगली होती सारा केदारनाथ नाही तर सिम्बामधून बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे.
'केदारनाथ' हा चित्रपट २०१३ मध्ये आलेल्या प्रलयाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. 'केदारनाथ’ हा चित्रपट एक पॅशनेट लव्ह स्टोरी आहे. चित्रपटात सारा एक साधी आणि गर्ल नेट डोरच्या इमेजमध्ये दिसणार आहे. वास्तविक सारा खूपच स्टायलिश आणि ट्रेण्ड फॉलो करणारी मुलगी आहे; मात्र या चित्रपटात तिची भूमिका तिच्या पर्सनॅलिटीशी अगदीच विभिन्न प्रकारची आहे. तर सुशांत सिंग राजपूत पिठ्ठूची भूमिका साकारणार आहे. हा दोघांची लव्हस्टोरी या चित्रपटात बघायला मिळणार आहे. दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच आतुर असतील यात काही शंका नाही. सारा एका श्रीमांत घरातील मुलगी असते आणि पिठ्ठू तिच्या प्रेमात पडतो.

#Kedarnath gets a new release date: 30 Nov 2018... Stars Sushant Singh Rajput and Sara Ali Khan... Abhishek Kapoor directs. pic.twitter.com/vPWoC6SKOy— taran adarsh (@taran_adarsh) May 8, 2018