जाणून घ्या कोण आहे 'मे-डे'मध्ये अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारणारी आकांक्षा सिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 07:00 PM2021-02-02T19:00:00+5:302021-02-02T19:00:03+5:30

आकांक्षा सिंग अजय देवगणच्या पत्नीची भूमिकेत दिसणार आहे.

Find out who is akanksha singh who will play ajay devgn's wife role in may-day movie | जाणून घ्या कोण आहे 'मे-डे'मध्ये अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारणारी आकांक्षा सिंग

जाणून घ्या कोण आहे 'मे-डे'मध्ये अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारणारी आकांक्षा सिंग

googlenewsNext

अजय देवगण सध्या  Mayday सिनेमाच्या  दिग्दर्शनात बिझी आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन, रकुल प्रीत सिंग आणि अंगिरा धर महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. त्याचवेळी अभिनेत्री आकांक्षा सिंग अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.

आकांक्षाचा हा दुसरा हिंदी चित्रपट आहे. वरुण धवन आणि आलिया भटच्या 'बद्रीनाथ की दुल्हनिया' या चित्रपटांमधून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर 2017 मध्ये आकांक्षाने 'मल्ली राव' सिनेमाव्दारे तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने देवदासमध्ये भूमिका साकारली. 2019 मध्ये आकांक्षाने पहलवान कन्नड चित्रपटात  मुख्य भूमिका साकारली होती. आकांक्षा तामिळ सिनेमात क्लॅपसह डेब्यू करते आहे.

आकांक्षा मूळची जयपूरची आहे. तिने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात 'ना बोले तुम ना मैने कुछ कह' या मालिकेतून केली, ज्यात तिने विडो मेघा भटनागरची भूमिका साकारली, त्यानंतर ती गुलमोहर ग्रँडमध्ये दिसली. या शोमध्ये आकांक्षाने 21 वर्षाच्या मुलीची भूमिका केली होती.

अजय देवगण दिग्दर्शित मे-डे सिनेमा पुढच्या वर्षी 29 एप्रिलला रिलीज होणार आहे.  गेल्या वर्षी 11 डिसेंबरला हैदराबादमध्ये अजयने चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली होती. 

13 जानेवारीला अजयने सांगितले होते, सिनेमाचे पहिले शूटिंगचे शेड्यूल लवकरत संपणार आहे. मे-डेच्या कथेविषयी अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही, मात्र अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंग सिनेमात पायलटच्या भूमिकेत आहेत. त्याचबरोबर अंगिरा धर वकील म्हणून दिसणार आहे. अमिताभ बच्चन यांचे पात्रही अद्याप समोर आले नाही.
 

Web Title: Find out who is akanksha singh who will play ajay devgn's wife role in may-day movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.