व्हायरल गर्ल प्रिया प्रकाशविरोधात गुन्हा दाखल; मुस्लिमांच्या भावना दुखाविल्याचा आरोप!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 09:32 AM2018-02-14T09:32:47+5:302018-02-14T15:15:04+5:30
व्हायरल गर्ल प्रिया प्रकाशविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुस्लिमांच्या भावना दुखाविल्याचा आरोप त्यामध्ये करण्यात आला आहे.
म ्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर सध्या इंटरनेट सन्सेशन बनली आहे. ती आगामी ‘ओरू अदार लव’ या मल्याळम चित्रपटात बघावयास मिळणार आहे. चित्रपटातील एका गाण्यात आपल्या ‘खल्लास’ अदा दाखवित तिने तरुणाईला अक्षरश: भुरळ पाडली आहे. रातोरात सुपरस्टार बनलेली प्रिया आता मात्र अडचणीत सापडताना दिसत आहे. ‘हैदराबाद यूथ’ने चित्रपटाचे निर्माता आणि प्रिया प्रकाश विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या मते, व्हायरल होत असलेल्या गाण्यामध्ये मुस्लीम धर्मीय लोकांच्या भावना दुखाविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी गाण्यातील काही शब्दांवर आक्षेप घेतला असून, त्यामुळे मुस्लिमांच्या भावना दुखावल्या असल्याचे म्हटले आहे.
चित्रपटातील गाणे ‘मानिकया मलरया पूवी’ नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. ज्यामध्ये प्रिया स्कूल असेंबलीमध्ये तिच्या वर्गमित्राशी डोळ्यांनी इशारा करीत बोलताना दिसत आहे. या गाण्यामुळेच प्रिया सध्या सुपरस्टार बनली आहे. मात्र आता या गाण्याच्या विरोधात हैदराबादमधील काही तरुणांनी गुन्हा नोंदविला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, प्रिया प्रकाश आणि चित्रपट निर्मात्याच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणांच्या मते, आम्हालादेखील हा व्हिडीओ खूप आवडला. मात्र जेव्हा आम्ही मल्याळम भाषेतील या गाण्याचा अनुवाद केला तेव्हा आम्हाला गाण्यातील काही शब्द धार्मिक भावना दुखाविणारे असल्याचे आढळून आले. त्यानंतरच आम्ही गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, चित्रपटाचे हे गाणे रिलीज होऊन काही काळच झाला असून, आतापर्यंत ९ मिलियनपेक्षा अधिक लोकांनी हे गाणे बघितले आहे. हे गीत रिलीज झाल्यापासूनच प्रिया सातत्याने चर्चेत राहत आहे. रातोरात तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली असल्याने तिचे शिक्षकही चांगलेच खूश झाले आहेत. प्रिया १८ वर्षांची असून, बी. कॉम.ची विद्यार्थिनी आहे. ती तिच्या डेब्यू चित्रपटातही एका विद्यार्थिनीचीच भूमिका साकारत आहे. काही तासांपूर्वीच चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आला आहे. या टीजरमध्ये प्रिया को-अॅक्टर रोशनला डोळ्यांनी इशारा करताना दिसत आहे.