पुन्हा नव्या प्रकरणात अडकला सलमान खान, दिल्लीत एफआयआर दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 06:26 AM2017-12-21T06:26:00+5:302017-12-21T11:56:00+5:30
बॉलिवूडचा ‘दबंग’खान अर्थात सलमान खान एका नव्या प्रकरणात फसण्याची चिन्हे आहेत. होय, दिल्लीच्या गांधीनगर ठाण्यात सलमानविरोधात जातिवाचक शब्दाचा वापर ...
ब लिवूडचा ‘दबंग’खान अर्थात सलमान खान एका नव्या प्रकरणात फसण्याची चिन्हे आहेत. होय, दिल्लीच्या गांधीनगर ठाण्यात सलमानविरोधात जातिवाचक शब्दाचा वापर केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
स्वच्छता कर्मचारी युनियनने सलमानविरोधात तक्रार दाखल केली आहे. एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सलमानने एका विशिष्ट समाजाबद्दल जातिवाचक शब्दांचा वापर केला. सलमानचे हे शब्द संबंधित समाजाच्या भावना दुखावणारे आहेत, असे युनियनने म्हटले आहे.
तक्रारकर्ते संजय गहलोत यांनी या प्रकरणासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. अलीकडे आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सलमानने खासगी वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत चित्रपटाच्या डान्स डायरेक्टरने दिलेल्या डान्स स्टेप्सची तुलना करताना जातिवाचक शब्दाचा वापर केला. त्याच्या या जातीवाचक शब्दांनी वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. वाल्मिकी समाजात प्रचंड रोष आहे, असे गहलोत यांनी सांगितले. बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी अशा जातीवाचक शब्दांचा वापर करणे चुकीचे आहे. त्यांचे असे वागणे कुठल्याही स्थितीत खपवून घेतले जाणार नाही, असे गहलोत यांनी सांगितले.
दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे. यामुळे सलमान पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. अर्थात कायदेशीर वादात सापडण्याची सलमानची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी हिट अॅण्ड रन केस आणि काळवीट शिकार प्रकरणात सलमानने अनेक वर्षे कोर्टाच्या पाय-या झिजवल्या आहेत.
ALSO READ : सलमान खानबद्दल काय आहेत कॅटरिना कैफच्या भावना?
लवकरच सलमानचा ‘टायगर जिंदा है’ चित्रपट रिलीज होणार आहे. पण तूर्तास ‘प्राईम टाईम’वरून महाराष्ट्रात हा चित्रपट वादात सापडला आहे.सलमानच्या चित्रपटाला राज्यातील मल्टिप्लेक्सनी प्राईम टाईम दिला आहे. यामुळे ‘देवा’ या मराठी चित्रपटाला स्क्रिन्स उपलब्ध नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात विरोधाचे हत्यार उपसले आहेत. ‘टायगर जिंदा है’ला प्राईम टाईम देत असाल तर ‘देवा’लाही द्या, अशी मागणी या राजकीय पक्षाने केली आहे.