मुलीला मिळालेल्या बलात्काराच्या धमकी प्रकरणात अनुराग कश्यप यांची पोलिसांत तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 02:05 AM2019-05-27T02:05:44+5:302019-05-27T02:06:24+5:30
मुलीला मिळालेल्या बलात्काराच्या धमकी प्रकरणात अनुराग कश्यपनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
मुंबई- वास्तववादी चित्रपट बनवणा-या अनुराग कश्यप यांचा एक वेगळाच चाहतावर्ग आहे. राजकारणापासून सामाजिक मुद्द्यांवर परखड मत मांडणारे अनुराग आपल्या या स्वभावामुळे अनेकदा ट्रोल होतात. परंतु एका अशाच ट्रोलरने सर्व मर्यादा ओलांडत अनुराग यांच्या मुलीला अतिशय अश्लील भाषेत धमकी दिली होती. त्यानंतर आता मुलीला मिळालेल्या बलात्काराच्या धमकी प्रकरणात अनुराग कश्यप यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
अनुराग कश्यप यांनी मुंबईतल्या आंबोली पोलिसांत तक्रार दिली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक ट्विट करत मुंबई पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत. ट्विटमध्ये ते म्हणाले, मला तक्रार नोंदवण्यात मदत केलेल्या मुंबई पोलीस, सायबर क्राइम आणि ब्रिजेश सिंग यांचे मी आभार मानतो. ही सर्व प्रक्रिया सुरू करण्यात तुम्ही दिलेल्या सहकार्यानं मी धन्य झालो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मी आभारी आहे.
Anyways I want to thank @MumbaiPolice@MahaCyber1@Brijeshbsingh for helping me with filing the FIR . Thank you so much for the amazing support and starting the process .Thank you @Dev_Fadnavis and thank you @narendramodi Sir. As a father I am more secure now .
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) May 26, 2019
आता वडील म्हणून मी आता सुरक्षित आहे. त्यानंतर सायबर गुन्हे शाखेचे पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंग यांनीही अनुराग यांना काळजी करू नका, असं सांगितलं आहे. आम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारची सुरक्षा पुरविण्यासाठी कटिबद्ध असल्याचंही ब्रिजेश सिंग म्हणाले आहेत.
Please do not worry, we are duty bound to protect, online and offline.— Brijesh Singh (@Brijeshbsingh) May 26, 2019