वरुण आणि सारा अली खानच्या या सिनेमाच्या सेटवर लागली आग, वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 13:09 IST2019-09-11T13:08:43+5:302019-09-11T13:09:10+5:30
वरुन धवन आणि सारा अली खानच्या कुली नंबर वन सिनेमाचे शूटिंग सुरु झाले आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन डेव्हिड धवन करत आहेत.

वरुण आणि सारा अली खानच्या या सिनेमाच्या सेटवर लागली आग, वाचा सविस्तर
वरुन धवन आणि सारा अली खानच्या कुली नंबर वन सिनेमाचे शूटिंग सुरु झाले आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन डेव्हिड धवन करत आहेत. नुकतंच या सिनेमाच्या सेटला आग लागल्याची घटना घडली आहे. मुंबईतल्या गोरेगावमध्ये फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये आग लागली. न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार मंगळवारी रात्री 12.30 च्या सुमारास ही घटना घडली. आग नेमकी कोणत्या ठिकाणी लागली याबाबतची कोणतीच माहिती मिळू शकलेली नाही.सुदैवाने कोणतीच जीवितहानी झालेली नाही. तसंच सेटवरील नुकसानाची कोणतीच माहितीसमोर आलेली नाही.
१९९५ मध्ये प्रदर्शित झालेला 'कुली नं-1' सिनेमात गोविंदा, करिष्मा कपूर, कादर खान आणि शक्ती कपूरसारख्या कलाकारांच्या भूमिका होत्या. या सिनेमाला रसिकांची तुफान पसंती मिळवली होती.
आजही कुली नंबर 1 आठवताच गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्यामधील असलेली केमिस्ट्री आजही डोळ्यासमोर उभी राहते. इतके वर्ष ओलांडली असली तरीही कुली नंबर - सिनेमाची जादू कमी झालेली नाही. त्यामुळे आता सिनेमाचा सिक्वेल बनत असल्यामुळे तीच लोकप्रियता या सिक्वलला मिळेल का हे पाहणे रंजक ठरणार आहे.
तुर्तास स्ट्रिट डान्सर 3 डी’ सिनेमात वरूण धवन झळकणार आहे. हा चित्रपट ८ नोव्हेंबर २०१९ला प्रदर्शित होणार होता. पण मागच्याच महिन्यांत या चित्रपटाच्या नव्या रिलीज डेटचा खुलासा झाला होता.चित्रपटाची रिलीज डेट ८ नोव्हेंबरवरून पुढील वर्षी २४ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. असे का? तर आता या कारणाचा खुलासा झाला आहे. सूत्रांचे मानाल तर वरूण धवनच्या लग्नामुळे ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’ची रिलीज डेट लांबणीवर टाकण्यात आली आहे.