'थलायवी' सिनेमातील एमजीआर यांचा लूक आऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 15:57 IST2020-01-17T15:44:11+5:302020-01-17T15:57:08+5:30
बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत लवकरच ‘थलायवी’ या बायोपिकमध्ये मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसणार आहे.

'थलायवी' सिनेमातील एमजीआर यांचा लूक आऊट
बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत लवकरच ‘थलायवी’ या बायोपिकमध्ये मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमातील कंगानाचा फर्स्ट लूक आऊट झाल्यानंतर या सिनेमातील एमजीआर साकारत असलेल्या अऱविंद स्वामींचा लूक देखील रिलीज झाला आहे. तमिळनाडूचे दिवंगत माजी सीएम एमजीआर यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त हा लूक रिलीज करण्यात आला आहे.
अभिनेता आणि यशस्वी नेता या नात्याने एमजीआरचे भव्य जीवन, आणि आयुष्यभर त्यांनी पाहिलेल्या उच्च आणि मैलाचे दगड त्यांनी सर केले होते त्यांचे हेच क्षण साजरे करणारे, निर्माते विष्णू वर्धन इंदुरी आणि शैलेश आर सिंह यांनी अभिनेता अरविंद स्वामी यांच्या थलावी मधील एमजीआर यांच्या पहिल्या पोस्टर रिलीज करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक विजय म्हणतात, “मी यापूर्वी म्हटल्याप्रमाणे, थलायवीसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. आजच्या काळातील मोठ्या प्रमाणावर तमिळनाडूला आकार देणाऱ्या दिग्गजांच्या आयुष्यात डोकावण्याचा एक खुप मोठ अनुभव आहे. पण या रोमांचक आणि आव्हानात्मक प्रक्रियेचे मिश्रण म्हणजे या अतुलनीय भूमिकांवर लिखाण आणि कलाकारांची कास्टिंग. एमजीआरच्या भूमिकेसाठी आम्हाला अनेक कलाकारांचा विचार करावा लागला. शेवटी, आम्हाला असे वाटले की अरविंद स्वामी योग्य प्रकारे परिपूर्ण दिसेल.‘थलावी’ 26 जून 2020 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.