सलमानच्या 'भारत'चा फर्स्ट लूक रिलीज, काय असणार खास?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 13:25 IST2018-08-15T13:25:19+5:302018-08-15T13:25:51+5:30
सलमान खानच्या आगामी आणि बहुचर्चीत 'भारत' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाबाबत आणि सिनेमातील कास्टबाबत चर्चा होत आहे.

सलमानच्या 'भारत'चा फर्स्ट लूक रिलीज, काय असणार खास?
(Image Credit : www.freepressjournal.in)
मुंबई : सलमान खानच्या आगामी आणि बहुचर्चीत 'भारत' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाबाबत आणि सिनेमातील कास्टबाबत चर्चा होत आहे.
या सिनेमाच्या फर्स्ट लूकचा ४९ सेकंदाचा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला सलमान खान याने वॉइस ओव्हर दिलाय. ज्यात त्याने एक डायलॉग म्हटला आहे. या टीझरमुळे या सिनेमाची उत्सुकता आणखी ताणली गेली आहे.
Kuch Rishte Zameen se hote hai, Aur kuch Khoon se.. Mere Paas Dono Thee ! कुछ रिश्ते ज़मीन से होते है, और कुछ खून से.. मेरे पास दोनो थे !@Bharat_TheFilm@aliabbaszafar@atulreellife#KatrinaKaif#Tabu@DishPatani@WhoSunilGrover@norafatehi@nikhilnamit@reellifeprodn@tseriespic.twitter.com/myeyEpWdPx
— Salman Khan (@BeingSalmanKhan) August 15, 2018
दरम्यान, हा सिनेमा प्रियंका चोप्राने सोडल्यामुळे या सिनेमात मुख्य अभिनेत्रीची भूमिका कोण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रियंकानंतर या सिनेमात कतरिना कैफ दिसणार आहे. या सिनेमात सलमानसोबतच तबू, कतरिना कैफ, दिशा पटनी, सुनील ग्रोव्हर दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अली अब्बास जफर करत आहे. हा सिनेमा पुढील वर्षी ईदला रिलीज होणार आहे.