पहिल्या भेटीत अजय देवगणला अजिबातच आवडली नव्हती काजोल, मग लग्न कसे झाले? वाचा सविस्तर!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 11:38 AM2017-09-16T11:38:34+5:302017-09-16T17:08:34+5:30
बॉलिवूडमधील हॅप्पी कपल्सपैकी एक असलेले अजय देवगण आणि काजोल त्यांच्या संसारात सुखी आहेत. १९९९ मध्ये हे दोघे विवाहबंधनात अडकले. ...
ब लिवूडमधील हॅप्पी कपल्सपैकी एक असलेले अजय देवगण आणि काजोल त्यांच्या संसारात सुखी आहेत. १९९९ मध्ये हे दोघे विवाहबंधनात अडकले. आज या दाम्पत्याला मुलगा युग आणि मुलगी न्यासा अशी दोन मुले आहेत. या दोघांचेही बॉलिवूडमधील इतर कपल्सप्रमाणेच एकमेकांवर प्रेम जडले आणि नंतर हे दोघे विवाहाच्या बंधनात अडकले. परंतु तुम्हाला माहिती आहे काय की, पहिल्यांदा जेव्हा अजय देवगणने काजोलला बघितले होते, तेव्हा त्याला ती अजिबातच पसंत आली नव्हती. होय, जेव्हा या दोघांची पहिली भेट झाली तेव्हा अजयने काजोलला बघून न बघितल्यासारखे केले, तर काजोलला मात्र अजय खूपच भावला होता. अजयला सुरुवातीपासूनच असे वाटत होते की, काजोल आणि त्याच्यात कधीच जमणार नाही. कारण दोघांच्या विचारात प्रचंड मतभेद होते. परंतु आज हे दोघे एकत्र असून, सुखाने संसार करीत आहेत.
एका मुलाखतीत अजयने सांगितले होते की, ‘जेव्हा मी पहिल्यांदा काजोलला भेटलो तेव्हा पुन्हा हिला भेटावे असे मला अजिबातच वाटले नाही. कारण मला काजोल अजिबातच आवडली नव्हती. त्यावेळी मला ती खूपच लाउड, गर्विष्ठ आणि वायफळ बोलणारी वाटायची.’ त्याकाळी अजय देवगणचे एका अभिनेत्रीशी अफेअर सुरू होते. त्यामुळे तो काजोलविषयी अजिबातच गंभीर नव्हता. मात्र पुढे काजोलने काय जादू केली हे कोणालाच कळाले नाही. कारण बघता-बघता दोघांमध्ये प्रेमांकुर फुलू लागले. पुढे हे दोघे विवाहबंधनात अडकले.
या मुलाखतीत अजयने म्हटले होते की, जसजसा काळ गेला तसे आमच्यातील प्रेम अधिकच बहरत गेले. आम्ही कधीच एकमेकांना लग्नाविषयीची मागणी घातली नव्हती. आमच्यात याबाबत चर्चा होत नव्हती, परंतु आम्हाला माहिती होते की, एकदिवस आम्हाला लग्नाच्या रेशीमगाठी बांधाव्या लागतील. तसेच काजोल तिच्या करिअरविषयी एकदम क्लिअर होती. लग्नानंतरही एका वर्षात किमान एक तरी चित्रपट करणार हे तिने अगोदरच ठरविले होते.
२००३ मध्ये न्यासाचा जन्मानंतर काजोलने ‘फना, यू मी और हम, माय नेम इज खान, वी आर फॅमिली, टूनपूर का सुपरहिरो आणि दिलवाले’ या चित्रपटांमध्ये काम केले. त्याचबरोबर तिने आपल्या रिअल लाइफ पार्टनरसोबतही अनेक चित्रपटांमध्ये रोमान्स केला. ‘प्यार तो होना ही था, हलचल, इश्क, गुंडाराज आणि दिल क्या करे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये ही जोडी झळकली. शिवाय प्रेक्षकांनाही पसंत आली. याच दरम्यान त्यांच्यात प्रेम फुलले अन् पुढे हे दोघे विवाहबंधनात अडकले. मात्र सुरुवातीचा काळ बघता यांच्यात फारसे जमत नव्हते. पण आज ज्या पद्धतीने हे दोघे संसार करीत आहेत, ते बघून विभक्त होऊ इच्छिणाºया बॉलिवूडमधील जोडप्यांनी त्यांचा आदर्श घ्यायला हवा, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये.